आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Panchawat Police Squad Performance : Burgluar Ganga In Jail

पंचवटी पोलिसांच्या गस्तपथकाची कामगिरी : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी - पंचवटी परिसरात घरफोडी, दरोड्याचे सत्र सुरू असतानाच पोलिसांनी दरोड्याच्या तयारीतील दरोडेखोरांची टोळी सोमवारी जेरबंद केली. या टोळीकडून घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पंचवटी पोलिस ठाण्याचे गस्त पथक सोमवारी (दि. 18) पहाटे हिरावाडी त्रिकोणी बंगला परिसरात असतांना परिसरात संशयितरीत्या फिरताना काही तरुण आढळले. पथकाने त्यांना हटकले असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे देत पलायन करण्याचा प्रयत्न केला. पथकाने पाठलाग करून थोड्याच अंतरावर पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता तलवार, दोरी, मिरचीपूड, कोयता कटवणी असे दरोडा टाकण्याचे साहित्य मिळाले. रघुनाथ गणपत बोडके, कांचन अनिल खाटीकडे, नीलेश गणेश जाधव, संदेश सुधाकर पगारे, सागर संजय गुंजाळ उर्फ कडक अशी या पाच जणांची नावे असून सर्वजण पेठरोड परिसरात राहणारे आहेत. सहायक निरीक्षक जगदीश भांबळ, संजय पवार, वसंत पांडव, वाळू लभडे, प्रवीण वाघमारे, सुनील कोकाटे, राजू निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली. या टोळीकडून घरफोडीचे गुन्हे उघडकीस येणार आहे. टोळीतील पाचही जणांवर घरफोडी, चोरीचे गंभीर गुन्हे दाखल असून सर्व अट्टल घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार आहेत.