आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेगा ब्लाॅकमुळे पंचवटी गाेदावरी एक्स्प्रेस रद्द ; लांब पल्ल्याच्या गाड्या धावल्या सात तास उशिराने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकाजवळ रविवारी (दि. २५) उड्डाणपुलासाठी गर्डर टाकण्याचे काम सुरु असल्याने मध्य रेल्वेने सहा तासाचा मेगा ब्लाॅक ठेवला होता. तसेच अंबरनाथ आणि बदलापुर रेल्वे स्थानकादरम्यान साडे चार तासाचा मेगा ब्लाॅक ठेवल्याने मनमाडहुन सुटणारी पंचवटी आणि गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. यामुळे रविवारी प्रवाशांना घरी परतावे लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. तर लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस सहा ते सात तास उशिराने धावल्या. 
 
रेल्वे ट्रकवरुन उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने ठाकुर्ली स्थानकाजवळ रविवारी सकाळी ९ ते दुपारी ३.१५ पर्यंत गर्डर टाकण्याचे काम सुरू होते. त्यामुळे रेल्वेने सहा तासाचा मेगा ब्लाक ठेवला होता. नाशिकरोड देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकात प्रवासी नेहमीप्रमाणे रेल्वे गाड्यांच्या वेळेप्रमाणे पाेहाेचले हाेते. परंतु स्थानकात आल्यानंतर पंचवटी, गोदावरी आणि सेवाग्राम एक्स्प्रेस मुंबईसाठी रद्द केल्याचे समजले. यावेळी प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकरोड येथून रद्द करण्यात आली होती. 

मुंबईकडे जाणाऱ्या हावडा, राजेंद्रनगर, गोरखपूर, इलाहाबाद, वाराणसी,जनशताब्दी, हटिया, महानगरी, दुरंतो, पाटलीपुत्र या सर्व एक्स्प्रेस रेल्वेगाड्या उशिराने धावल्याने नाशिक शहरातील प्रवाशांनी महामार्गाने जाणे पंसत केले. तर काही प्रवाशांनी मुंबईत मुसळधार पाऊस असल्याने प्रवासच रद्द केला. रेल्वे गाड्या एेनवेळी रद्द झाल्याने तसेच काही गाड्यांना उशीर झाल्याने काही प्रवाशांनी संताप व्यक्त केला. 
 
 
बातम्या आणखी आहेत...