आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थात विजेसाठी पंचवटीत महावितरणकडून अघोषित वीज भारनियमन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थात वीज वितरण कपंनीकडे अतिरिक्त विजेची मागणी वाढल्याने पंचवटी भागात अघोषित भारनियमन सुरू करण्यात अाले अाहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतीला विजेच्या पंपांनी पाणी भरण्याची वेळ आली आहे. मात्र, भारनियमनाने पाणी असूनही पाणी देण्यास शेतकरी असमर्थ आहेत. वीज वितरण कंपनीकडून भारनियमनाबाबत कल्पना दिल्याने शेतकऱ्यांसह ग्राहकांना फटका बसला आहे.
सिंहस्थामध्ये साधुग्राममध्ये आणि अन्य ठिकाणी विजेची मागणी वाढली आहे. सिंहस्थ काळात वीज कंपनीकडून अखंड वीजपुरवठा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, जनरेशन कमी झाले. विजेची मागणी वाढली असल्याने रोज सकाळी १० ते सायंकाळी वाजेपर्यंत अघोषित भारनियमन सुरू करण्यात आले आहे. विजेअभावी दैनंदिन कामे खोळंबली आहेत. वीजग्राहकांसह शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे निदर्शनास येत आहे. परळी येथील मुख्य रोहित्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रोटेशनप्रमाणे भारनियमन सुरू आहे. मात्र, पंचवटी भागात कुंभमेळ्यात अतिरिक्त मागणी वाढल्याने भारनियमन सुरू असल्याचे वीज वितरण कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. वीज वितरण कंपनीकडून एक दिवसाआड अथवा आठवड्यातून एकदा भारनियमनाचे नियोजन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
याभागात भारनियमन : आडगाव,मळे परिसर, कोणार्कनगर, म्हसरूळ मळे परिसर, विंचूरगवळी, सय्यदपिंप्रीरोड या भागात भारनियमनाचा प्रभाव जाणवत आहे.

पिके करपली
^पाऊसनाही. पेरणी केलेल्या पिकांना विहिरीतून पाणी देऊन वाचवण्याचा प्रयत्न आहे. विजेअभावी ते शक्य होत नाही. पाण्याअभावी पिके करपत चालली आहेत. पोपटलभडे, शेतकरी

भाजीपाला हाेताेय खराब
^विजेअभावीफ्रीजमध्ये ठेवलेला भाजीपाला खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. भाजीपाला महाग झाल्याने आर्थिक तोटा होत आहे. शिवाजीमाळोदे, नागरिक
बातम्या आणखी आहेत...