आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढिसाळपणा - निरीक्षणातही पंचवटीला पुन्हा झाला उशीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी पंचवटी एक्सप्रेसच्या वेळेचे निरीक्षण सुरू केलेले असतानाही पंचवटीला बुधवारी सकाळी तब्बल 25 मिनिटे उशिर झाला. यानंतर संतप्त प्रवाशांनी आक्रमक भूमिका घेत प्रभारी अधीक्षक पुरुषोत्तम लाल यांना जाब विचारला. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर 30-40 प्रवाशांनी तक्रार पुस्तकात तक्रार नोंदवली.

दुरांतोमुळे पंचवटीला उशीर होत असल्याने पंचवटीच्या वेळेत 10 मिनिटांचा बदल करण्यात आला. तरीही पंचवटी 20 मिनिटे उशिरा म्हणजे 7.30 वाजता आली व 7.10 ऐवजी 7.35 वाजता, म्हणजे 25 मिनिटे उशिराने रवाना झाली. इगतपुरीला सकाळी 8 ऐवजी 8.20, दादरला 10.25 ऐवजी 11.15, तर छत्रपती शिवाजी टर्मिनसला सकाळी 10.45 ऐवजी 11.30 वाजता पाऊण तास उशिरा पोहचली.

नाशिकरोडवरून 7.10 वाजता दुरांतो व 7.20 वाजता ‘राजेंद्रनगर’ रवाना झाल्यानंतर पंचवटीला हिरवा कंदील मिळाला. घोटीनजिक ‘राजेंद्रनगर’ बाजूला करून पंचवटी पुढे काढण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा पंचवटी उशिराने धावत असल्याने प्रवासी संतप्त झाले.

ये रे माझ्या मागल्या - मागील आठवड्यात पंचवटीला सलग तीन दिवस 40-50 मिनिटे उशीर झाल्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर खासदार समीर भुजबळ यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांची भेट घेऊन ‘पंचवटी’च्या समस्या मांडल्या. जैन यांनी गुरुवारपासून (दि. 26 जुलै) 10 दिवस दुरांतो व पंचवटीच्या निरीक्षणाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या निरीक्षणात पहिल्याच दिवशी पंचवटी 20 मिनिटे उशिरा धावली. त्यानंतर 27 ते 31 जुलैपर्यंत मात्र ती नियोजित वेळेत धावली. बुधवारी पुन्हा ती उशिराने धावली.