आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंडित दीनदयाळ उपाध्यायजींचे विचार सर्वदूर पोहोचवा :रवींद्र भुसारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पं.दीनदयाळ उपाध्याय यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने कार्यविस्तार योजनेंतर्गत त्यांचे विचार गावागावांत, घराघरात आणि मनामनापर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे,असे आवाहन भाजपचे प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांनी केले. 
 
पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून भाजपतर्फे पक्ष विस्तारासाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यविस्तार योजनेची माहिती देण्यासाठी ‘वसंतस्मृती’ कार्यालयात आयोजित उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना भुसारी बोलत होते. व्यासपीठावर या योजनेचे महाराष्ट्राचे संयोजक आमदार हरिभाऊ जावळे, प्रदेश सरचिटणीस योजनेचे सहसंयोजक डॉ. रामदास आंबटकर, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दिकी, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, खासदार हिना गावित, आमदार मामा भोळे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, अभय आगरकर, पं. दीनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार योजना समिती संयाेजक महानगर संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, संभाजी मोरूस्कर, पवन भगुरकर, काशिनाथ शिलेदार, विजय साने आदी होते. २६ मे ते १० जूनपर्यंत १५ दिवसांचा कार्यक्रम पक्षाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनाही अनिवार्य असल्याचेही भुसारी यांनी यावेळी निदर्शनास आणले. 
कार्य विस्तारक योजनेंतर्गत राज्यातील दोन कोटी घरांपर्यंत पोहोचायचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शत-प्रतिशत भाजप हेसुद्धा आमचे लक्ष्य आहे, असे आमदार जावळे आणि डॉ. आंबटकर यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्याच्या तसेच महानगरांच्या पक्षप्रमुखांनी कार्यविस्तारकांची यादी विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर यांना सादर केली. प्रास्ताविक लक्ष्मण सावजी यांनी केले. प्रारंभी भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. 
 
पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून भाजपतर्फे आयोजित उत्तर महाराष्ट्र बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना भाजपचे संघटनमंत्री रवींद्र भुसारी. समवेत पक्षाचे पदाधिकारी. 
 
बातम्या आणखी आहेत...