आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्काराच्या घटनांनंतर होणारे राजकारण व्यथित करणारे : पंकजा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘बलात्काराच्या घटनांनंतर केले जाणारे राजकारण हे व्यथित करते,’ असे मत महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.

केवळ महिला बालकल्याणमंत्री म्हणून नव्हे, तर एक महिला म्हणून मला या सर्व घटनांबद्दल अत्यंत खंत वाटते. बलात्कारी व्यक्ती कोणीही असो वा कोणत्याही पदावर असो, त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र अशा विकृतींना प्रतिबंध कसा घालता येईल, पीडित मुली- महिला या धक्क्यातून कशा बाहेर येऊन पुन्हा उभ्या राहतील याची संपूर्ण जबाबदारीही समाजाची असल्याचे त्या म्हणाल्या.

‘कोपर्डीची घटना झाली तेव्हा मी बाहेरगावी होते. तिथे गेले तेव्हा गर्दी बघून मी अधिकच व्यथित झाले. या गर्दीमुळे पीडित कुटुंबाला काय वेदना झाल्या असतील याची मी कल्पना करू शकते. पीडित कुटुंबाला भेट देऊन गोपनीयतेचा भंग करण्याचे तत्त्व मी पाळते,’ असेही मुंडे यांनी नमूद केले. ‘बलात्काराच्या घटनांनंतर आरोपींना तत्काळ अटक करणे, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवणे, पीडितेस साहाय्य करणे या सरकारच्या जबाबदाऱ्या आम्ही पार पाडत आहोत, असे त्या म्हणाल्या.

पण त्या पलीकडे जाऊन या विकृतीचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची आणि त्यांना प्रतिबंध घालण्याची जबाबदारी सरकारच्या पलीकडे जाऊन संपूर्ण समाजाची आहे,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

स्वसंरक्षण कौशल्य वाढवणार
‘मुलींचे स्वसंरक्षणाचे कौशल्य वाढावे आणि मुलांचेही किशोरवयापासून काउन्सेलिंग व्हावे यासाठी महिला आयोगाच्या आणि माझ्या खात्याच्या माध्यमातून काही उपाययाेजना करण्याचा विचार अाहे,’ असे मतही पंकजा मुंडे यांनी मांडले.
बातम्या आणखी आहेत...