आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपद महिलेस दिल्यास स्पर्धेत : पंकजा मुंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे स्वप्न साध्य करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीची सत्ता गरजेची आहे. राज्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी यापुढे केंद्रात नव्हे, तर राज्याचेच नेतृत्व करण्याचा मानस व्यक्त करत महायुतीतर्फे पहिली महिला मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छाही पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. त्यामुळे महायुतीमध्ये मुख्यमंत्री होण्याच्या प्रमुख दावेदारांमध्ये आता पंकजा मुंडेंचेही नाव पुढे येऊ लागले आहे.

आघाडी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारलेली आमदार पंकजा मुंडे-पालवे यांची संघर्ष यात्रा नाशिकमध्ये आली. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून पंकजा मुंडे राज्यभरातील कार्यकर्ते नागरिकांशी संवाद साधत आहे. नाशिकमध्ये मेळावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत संघर्ष यात्रेच्या प्रवासाची माहिती दिली. मागील दहा वर्षांत आघाडी सरकारने कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करून महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटले. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष असल्याने परिवर्तन अटळ असल्याचे चित्र संघर्ष यात्रेत दिसले. संघर्ष यात्रेचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून दुसर्‍या टप्प्यास नाशिकमधून सुरुवात झाली. कोट्यवधी रुपयांचे घोटाळे हाच महायुतीच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असेलच, पण त्याचबरोबर भविष्याच्या दृष्टीने प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी विकासाचे मुद्देही राहतील, असेही त्यांनी सांगितले.

आघाडी सरकारच्या अपयशामुळे उद्योग बाहेर जात असून अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थाही धोक्यात असून महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर सुराज्य निर्माण करण्यासाठी संघर्ष यात्रेतून परिवर्तनाची लढाई सुरू आहे. सत्तांतराच्या क्रांतीत यात्रेचे मोठे योगदान राहील, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले. दरम्यान, विधानसभा िनवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून महायुतीकडून अद्यापही जागावाटप झालले नसताना मुख्यमंत्री होण्यासाठी अप्रत्यक्षपणे जोरदार प्रयत्न होत आहे.

तीन हजार किलोमीटरचा संघर्ष
सिंदखेड राजा ते चौंडी या तीन हजार किलोमीटरच्या संघर्ष यात्रेचा पहिला टप्पा नाशिकमध्ये पूर्ण झाला. विधानसभा निवडणुकीचे बिगूल खर्‍या अर्थाने वाजले असून दुसरा टप्पा सुरु झाला आहे. महाराष्ट्रातील ८० मतदार संघातून ही संघर्ष यात्रा प्रवास करणार असून सत्ता परिवर्तनाचे बीजे पेरण्यात येणार आहे. या यात्रेत २१ जिल्ह्यांतील ६०० गावांमधून जाणार आहे. शनिवार दि. (१३) सप्टेंबर रोजी नाशिकमधून पुढे सिन्नर मार्गे पुणे, पिंपरी चिंचवड, शिरवळ, दापोडी येथे मार्गेस्थ होणार आहे.