आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाेटाबंदी निर्णयाने पैशाएेवजी माणसाला झाले महत्त्व प्राप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनमाड - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा मोठा निर्णय घेतला. त्यामुळे आता पैशाला नाही तर माणसाला महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासाच्या कामांमुळे मोदींनी थेट लोकांच्या मनावरच राज्य केले आहे. जे लोकांच्या मनावर राज्य करतात, तेच लोकांच्या मतांवरही यापुढे राज्य करतील, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी येथे केले. येथील आययूडीपी मैदानावर आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या.
स्वातंत्र्याच्या अनेक वर्षांनंतरही मनमाडकर पाणी, रस्ते यांची मागणी करतात. अशी वेळ मनमाडकरांवर का यावी, असा प्रश्न मुंडे यांनी यावेळी उपस्थित करीत शहराची पाणीयोजना पूर्ण करण्याचे आश्वासन मुंडे यांनी दिले. यावेळी जिल्हा शहर भाजपतर्फे मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाध्यक्ष दादा जाधव, उपाध्यक्ष पंकज खताळ, बापूसाहेब पाटील आदींची भाषणे झाली. भाजप नेते अद्वय हिरे यांनी भाषणातून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. व्यासपीठावर माजी आमदार संजय पवार, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, कुसुमताई दराडे, नारायण पवार, उमाकांत राय, सचिन दराडे, नारायण फुलवाणी, एकनाथ बोडके, शहराध्यक्ष जय फुलवाणी, समीर चव्हाण, नितीन आहेर आदींसह भाजप नगरसेवकपदाचे उमेदववार उपस्थित होते. सूत्रसंचालन अंकुश जोशी यांनी केले. यावेळी भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले.
बातम्या आणखी आहेत...