आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षांची मुलगी ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिंगवे (ता. निफाड) येथे मंगळवारी सायंकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक साडेचार वर्षांची मुलगी ठार झाली. गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. शनिवारी बिबट्याच्या हल्ल्यात एक दहा वर्षांचा मुलगा ठार झाला होता. वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून वन अधिकाऱ्यांबद्दल संतापाची भावना व्यक्त हाेत अाहे.

पाटील मळा परिसरातील माणिक मोगल यांच्या शेतावरील कामगाराची मुलगी दीपाली रामकृष्ण काेठे (वय साडेचार वर्षे) ही मंगळवारी घराबाहेर खेळत होती. दुपारी साडेचारच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. त्यात दीपाली गंभीर जखमी झाली. कुटुंबीयांनी तिला तातडीने उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू असताना सायंकाळच्या सुमारास तिचे निधन झाले.