आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: घरात घुसलेला बिबट्या साडेसात तासांनंतर जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साेमवारी पहाटे साडेपाचची वेळ.... मुंबई - आग्रा महामार्गावरील मुंढेगावाजवळील गरुडेश्वर गावातील लोक शेतीच्या कामासाठी लवकर उठलेले... गावाबाहेर शेतात बिबट्या काही महिलांच्या नजरेला पडला... काही वेळातच साऱ्या गावात ‘बिबट्या आला.. बिबट्या आला’ ची वार्ता घुमली. उत्साही तरुणांनी बिबट्याला हुसकावण्यासाठी पुढाकार घेतला... याच गाेंधळात ताे थेट एका घरातच घुसला. प्रसंगावधान राखत ग्रामस्थांनी तातडीने हे घर बंद केले. सकाळी सात ते दुपारी अडीच वाजेपर्यंत त्याला जेरबंद करण्यासाठी कसरत करावी लागली. तब्बल साडेसात तासानंतर वन अधिकाऱ्यांनी त्याला बेशुद्ध करत ताब्यात घेतले अन् गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास साेडला.

तरुण बिबट्याला हुसकावत असताना तो पांडुरंग दादा कुंदे यांच्या नव्या घरात घुसला. सुदैवाने घरात कोणीही नव्हते. गावकऱ्यांनी वाडीवऱ्हे पोलिसांना याबाबत माहिती दिली. वनविभागाचे अधिकारीही रेस्क्यू व्हँनसह घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तिकडे बिबट्या पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. उत्साही तरुण आरडाओरड करत असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी अडचणी येत होत्या. वनक्षेत्रपाल सुनील वाडेकर यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी ट्रँक्युलायझर गनद्वारे दोन इंजेक्शन दिले. पण बिबट्या बेशुध्द होत नव्हता. तिसऱ्या इंजेक्शनमध्ये बिबट्या बेशुद्ध झाला आणि त्याला पकडून गंगापूर येथील वनविभागाच्या उद्यानात नेण्यात आले.
देवाच्या कृपेने वाचलो
^लोकांचाआवाज आला म्हणून घराबाहेर आले तेव्हा समजले की नव्या घरात बिबट्या घुसला आहे. पण त्यावेळी घरात कोणीही नसल्याने देवाच्या कृपेमुळे वाचलो. मीराबाईपांडुरंग कुंदे, गरुडेश्वर
ट्रँक्युलायझर गनद्वारे घरात लपलेल्या बिबट्याला बेशुध्द करण्यात आले.