आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेपर वाटप करणाऱ्या अमरला ९२ टक्के गुण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ताे पहाटे पेपर टाकताे, साेसायटीचा कचरा उचलताे, वाॅचमनचे काम करताे... हे सगळे सांभाळून त्याने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९२ टक्के गुण मिळविले. तीन वर्षांपूर्वी पितृछत्र हरपलेल्या अमर निवृत्ती राेकडे याची ही जिद्दीची कहाणी. घरात पुरेशी जागा नसल्याने अमरने इमारतीच्या गच्चीवर बसून अभ्यास केला. त्याला स्पर्धा परीक्षा देऊन चांगला अधिकारी हाेण्याची इच्छा अाहे. पण, या स्वप्नाला अडसर ठरत अाहे ती त्याची बिकट अार्थिक परिस्थिती.
अभ्यासासाठी सर्व सुखसुविधा उपलब्ध असूनही चांगले गुण मिळतीलच, याची शाश्वती नसते. परंतु, अभ्यासासाठी पूरक वातावरण नसतानाही अमरने दहावीच्या परीक्षेत देदीप्यमान यश मिळविले अाहे. सीबीएस येथील डी. डी. बिटकाे शाळेत त्याने प्रथम क्रमांक पटकावला. वाशिम जिल्ह्यातील लहीकुंभी येथील मूळचा रहिवासी असलेल्या अमरच्या वडिलांना ब्रेन ट्युमरच्या अाजाराने काही वर्षांपूर्वी ग्रासले. या अाजारावरील उपचाराचा खर्च अधिक असल्याने त्यांना शेतीवाडी विकावी लागली. तरीही उपचाराला पैसा कमी पडत असल्याने कर्ज काढावे लागले. या कर्जाची परतफेड करण्यासाठी राेकडे कुटुंब नाशिकमध्ये अानंदवली परिसराजवळील काळेनगरमध्ये स्थलांतरित झाले. मात्र, अमरला त्याच्या वडिलांचा सहवास फारसा लाभला नाही. अल्पावधीतच त्यांची प्राणज्याेत मालवली. अशा परिस्थितीत शिक्षण साेडून तू कामाला लाग, असा अाग्रह त्याच्या अाईने धरला. मात्र, अमरला चांगला अधिकारी व्हायचे अाहे. त्यामुळे त्याने जिद्दीने शिक्षण पुढे सुरू ठेवले. त्याला शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी लतिका गरुड अाणि वैशंपायन या शिक्षिकांची नेहमीच मदत लाभली. याशिवाय, मुख्याध्यापक अरविंद वाघ, खांडगे यांचे त्याला नेहमीच मार्गदर्शन लाभले. पहाटे उठून पेपर वाटणे, त्यानंतर परिसरातील चारचाकी वाहने धुणे, साेसायट्यांमधील कचरा उचलणे, ईशा अपार्टमेंटमध्ये वाॅचमन म्हणून काम करणे अादी कामे करून ताे कुटुंबाला हातभार लावू लागला. त्याची अाईदेखील धुणीभांडीचे काम करते. दहावीला त्याला तब्बल ९२ टक्के मिळाले असून, भाेंसला महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची त्याची इच्छा अाहे.

तरच अमरचे स्वप्न पूर्ण हाेईल
अमरलायूपीएससी किंवा एमपीएससी परीक्षेत यश मिळवून माेठा अधिकारी व्हायचे अाहे. त्यासाठी कष्ट करण्याचीही त्याची तयारी अाहे. मात्र, या प्रगतीस बिकट अार्थिक परिस्थितीचा माेठा अडसर हाेत अाहे. हा अडसर दूर करण्यासाठी दानशूरांनी स्टेट बँक अाॅफ इंडियाच्या ३४१४४१९६९७२ या अकाउंट क्रमांकावर मदत करावी किंवा ९७६७३९८६८० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे.