आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विकलांग मुलीसाठी सर्वस्व पणाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जन्मजात विकलांगता आलेल्या मुलीच्या उपचारासाठी सर्वस्व पणाला लावणार्‍या माता-पित्यांवर अखेर काळजावर दगड ठेवून येथील कीर्ती केअर सेंटरमध्ये आपल्या मुलीला सोडून देण्याची वेळ आली आहे.


हिमाचल प्रदेशातील हे दांपत्य असून आपल्या विकलांग मुलीवरील उपचारावरील खर्च मुंबईतील स्वत:चा गाळा विकून आलेल्या पैशातून उपचार केले. त्यातूनही या मुलीत सुधारणा न झाल्याने तुटपुंज्या मिळकतीमधून मुलीची काळजी घेता येणार नसल्याने त्यांनी तिला कीर्ती केअर सेंटरमध्ये ठेवले आहे. पाच वर्षांच्या राणीची करुण कहाणी आहे. ती जन्मल्यानंतर सात दिवस रडलीच नाही. पाच वष्रे केलेल्या उपचारांचा उपयोग झाला नाही. राणीचे वडील मुंबईत एका हॉटेलात स्वयंपाकी म्हणून, तर आई कॉल सेंटरमध्ये काम करते. राणीला सामान्य जीवन देण्यासाठी समाजसेवी संस्थानी मदत करावी, असे आवाहन ‘कीर्ती केअर’चे गणेश पाटील यांनी केले.


या उपचाराची गरज
राणीला स्पायथेरपी आणि फिजिओथेरपीची गरज होती. हे उपचार मिळाले नाही म्हणून राणीची शारीरिक वाढ झाली, मात्र मानसिक वाढ खुंटली. डॉ. वाल्मीक साळवे, वैद्यकीय अधिकारी, कीर्ती केअर सेंटर


.म्हणून घेतली जबाबदारी
राणीची आई तिला येथे सोडायला आली तेव्हा तिचा वियोग बघून खूप गलबलून आले. येथे लहान मुलांवर उपचार नसूनही सेंटरच्या जबाबदारीवर उपचार सुरू केले. सत्यसाईबाबा ट्रस्टमध्ये स्टेमसेल बदल करण्यासाठी उपचार सुरू आहेत. येथे डॉ. देसाई हे उपचार करत आहेत. गणेश पाटील, संचालक, कीर्ती सेंटर