आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यानाच्या देखभालीचे काम दिले जाणार एकाच संस्थेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील २७५ माेठ्या उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीचा मार्ग अखेर माेकळा हाेण्याची चिन्हे असून, गेल्या अनेक महिन्यापासून महिला बचत गटांकडे देखभाल द्यायची, की संस्थाकडे या मतभेदावर स्थायी समिती सभापती सलीम शेख यांचा ताेडगा निर्णायक ठरला अाहे. अाता दर्जेदार काम जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने एकाच संस्थेकडे काम दिले जाणार असून, त्यात ६० टक्के कर्मचारी महिला बचतगटांचे ठेवण्याचे बंधन टाकले अाहे. जेणेकरून राेजगार पारदर्शक कामाचे उद्देशही साध्य हाेणार अाहे.
शहराची फुफ्फुसे मानली जाणारी उद्याने देखभालीचे कंत्राटही त्यामुळे पालिकेत वादाचा विषय ठरले हाेते. अलीकडेच उद्यान विभागातील महाघाेटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी त्यानुषंगाने उद्यान अधीक्षक जी. बी. पाटील यांना निलंबित करून झालेली फाेैजदारी कारवाई, १३ अधिकाऱ्यांच्या चाैकशी बघता या विभागाचे महत्त्व लक्षात येते. दरम्यान गेल्या काही दिवसात बचतगटांकडील कामाबाबत हाेणारे गैरप्रकार लक्षात घेत एकाच संस्थेकडे देखभालीचे कंत्राट देण्याचे ठरले. मात्र, महासभेत बचतगटांना राेजगार देण्याचा उद्देश संपुष्टात येईल, अशी भीती व्यक्त करीत नगरसेवकांनी महिला बचतगटांना कामे देण्याचा निर्णय घेतला. या घाेळात हा विषय अडगळीत पडला हाेता. महिला बचतगटांना कामे देण्याची प्रक्रिया सुरू केल्यावर अटी-शर्तीतील बदलाचा मुद्दा कळीचा ठरला. त्यावर महासभेत पुन्हा चर्चा झाल्यानंतर ठराव प्राप्त नसल्यामुळे कारवाई अडचणीत सापडली हाेती. या सर्वात, देखभालीअभावी उद्याने काेमजण्याची भीती निर्माण झाली हाेती. या विषयावरून सत्ताधारी मनसेवर टीका हाेऊ लागताच सभापती शेख यांनी पुढाकार घेऊन उद्यान देखभालीचा ठेका प्रशासनाच्या मतानुसार एकाच संस्थेला द्यायचा मात्र त्यात बचतगटातील महिलांना समाविष्ट करून घ्यायचे, असा पर्याय सुचवला. त्यावर महापाैरांनी हाेकार दर्शवल्याने अाता ठराव पाठवून प्रशासनाकडून कशी कारवाई हाेते हे बघणे महत्त्वाचे ठरेल.