आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यान घाेटाळा; बारा अधिकाऱ्यांची चाैकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेतील अत्यंत माेठ्या उद्यान घाेटाळ्याप्रकरणी अखेर या विभागाचे अधीक्षक जी. बी. पाटील यांच्यासह पालिकेच्या तब्बल १२ अधिकाऱ्यांना रडारवर घेत महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी संबंधितांची विभागीय चाैकशी सुरू केली अाहे. चाैकशी अधिकारी म्हणून उपायुक्त राेहिदास बहिरम यांची नियुक्ती करण्यात अाली असून, तीन महिन्यांत चाैकशी पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात अाली अाहे.
शहरात २००९ पासून गाजत असलेल्या या घाेटाळाप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवरून उद्यानांची देखभाल-दुरुस्ती, नव्याने निर्मिती अशा नानाविध कामासंबंधातील ४५० हून अधिक फाइल गहाळ झाल्यासंदर्भात सुनावणी झाली. अनेक वर्षे हे प्रकरण सुनावणीत अडकले असताना महापालिका आयुक्त डाॅ. गेडाम यांनी शिवसेना गटनेते अजय बाेरस्ते यांच्या पत्रानंतर हा विषय अधिक गांभीर्याने घेत या प्रकरणाची चाैकशी सुरू केली.

आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुखांना गहाळ फाइल्स पुन्हा सादर करण्यास सांगितले होते. मात्र, त्यात हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दीड महिन्यापूर्वी पाटील यांना निलंबित करून त्यांच्याविराेधात फाैजदारी कारवाई प्रस्तावित करण्यात अाली होती. दरम्यान, आता याप्रकरणी महापालिका प्रशासनाने पाटील यांच्याबराेबरच जबाबदार उद्यान निरीक्षक, शाखा अभियंत्यांच्या विभागीय चाैकशीसाठी नाेटिसा पाठवण्यात अाल्या अाहेत. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त अपील) नियम १९७९ च्या नियम नुसार विभागीय चाैकशी प्रस्तावित अाहे.

यांची हाेणार चाैकशी
उद्याननिरीक्षक - पी.पी. फाल्गुने, व्ही. एस. माेगल, अार. एन. पांडे, बी. टी. कटारे, अार. ए. गायकवाड
शाखाअभियंता - एन.अार. माेरे
कनिष्ठशाखा अभियंता - एस.एम. अाहेर
सहायकअधीक्षक - के.एच. राबडिया, एन. एम. साेनवणे
कनिष्ठलिपिक - ए.जी. भावसार, रत्ना नाईक-अाव्हाड

उद्यान अधीक्षक माेकळेच
महापालिका अायुक्तां सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष घातल्यानंतरही पाेलिसांनी उद्यान अधीक्षक पाटील यांच्याविराेधात फाैजदारी कारवाई केलेली नाही. महापालिकेने चार स्मरणपत्रे सरकारवाडा पाेलिसांना दिली असून, खुद्द पाेलिस अायुक्त जगन्नाथन यांच्याही कानावर घातल्याचे सांगितले जाते. त्यानंतरही पाेलिस चाैकशी अपूर्ण असल्याचे कारण देत कारवाई हाेत नसल्यामुळे संशय वाढला अाहे.