आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१८ ऐवजी १२ मीटरचा रस्ता, अतिक्रमणे उदंड, रहदारीत खंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ हा रस्ता सीबीएस, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, राणी भवन, बसथांबा, तीन मोठ्या बँका, हॉटेल्स आणि एक शाळा यांसारख्या विविध आस्थापनांमुळे महानगराचे जणू ‘हृदय’च ठरताना दिसतो. मात्र, अतिक्रमणे बेशिस्तीमुळे हा १८ मीटरचा रस्ता १२ मीटरचा झाल्याचे दिसून येत आहे. या अत्यंत गजबजलेल्या परिसरात वाहतूक काेंडी नित्याचीच बाब झालेली आहे. दिवसागणिक वाढत्या वाहनांच्या संख्येने, अतिक्रमणे, तसेच न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या वाहनांच्या संख्येतील वाढीमुळे येथील ‘ब्लाॅकेजेस’वर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची गरज आहे.

तीन मोठ्या बँका, हॉटेल्स, शाळा, वडापावच्या दुकानांबाहेर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा, रस्त्यावरच थांबणाऱ्या शहर बस, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वारंवार होणारी निदर्शने आणि आंदोलनांमुळे वाहतुकीत निर्माण होणारे अडथळे, या बाबी रस्त्यावरील वाहतुकीसाठी डौकेदुखी ठरताना दिसतात. व्यापारी संकुले आणि बँकांना कमी पडणारी पार्किंगची जागा, हॉटेल्सनी पार्किंगच्या जागेत वाढवलेल्या आसनव्यवस्थेमुळेदेखील रस्त्यांवर वाहने येऊन वाहतुकीची काेंडी होताना दिसते.

एकतृतीयांश रस्ता अडतो
त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभापर्यंतचा रस्ता १८ मीटरचा आहे. मात्र, सुमारे एकतृतीयांश म्हणजे सहा मीटरचा रस्ता अडथळ्यांनीच व्यापलेला आहे. एकेकाळच्या आग्रा महामार्गाचा भाग असूनही हा रस्ता आता वाहतुकीला अरुंद आणि अडथळ्यांच्या शर्यतीचा भाग बनला असून, सर्व अडथळे हटवण्याची गरज आहे.

ठोस कारवाईची गरज
यारस्त्यावर सीबीएस, जिल्हा न्यायालय, राणी भवन, अशोकस्तंभ, हुतात्मा स्मारकाच्या गेटबाहेर, तसेच आदर्श शाळेजवळ मुक्तपणे वाहने उभी केली जातात. पोअसतात, तोपर्यंत काहीशी पाळली जाणारी शिस्त ते गायब होताक्षणी पुन्हा मूळ पदावर येते. त्यामुळे ठोस कारवाईची गरज आहे.

सीसीटीव्हीद्वारे ठेवावी चौकांमध्ये देखरेख
कायमस्वरूपीरहदारीचा रस्ता असल्याने प्रत्येक चौकात पूर्णवेळ पोशक्य नसल्यास प्रत्येक चौकात चारही बाजूने एक याप्रमाणे किमान चार सीसीटीव्ही बसवून त्याद्वारे देखरेख करणे, तसेच अडथळे करणाऱ्या, नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर दंडाचा बडगा उगारल्यास या रस्त्यावरील पार्किंग, तसेच बेशिस्तीला आळा घालणे शक्य होऊ शकेल, असे मत व्यक्त होत आहे.