आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाही येथे वाहनतळ तरीही वापरले बळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - वाहतुकीची कोंडी व मोकळ्या जागेवर पार्किंगमुळे रहदारीत बाधा येत असल्याने शहर वाहतूक शाखा आणि महानगरपालिकेतर्फे वाहनांवर कारवाई करण्यात येत असली तरी वाहनतळाची व्यवस्था करण्यापूर्वीच दंड केला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शहरात मुक्तिधाम व सिन्नर फाटा वगळता इतरत्र महापालिकेचे अधिकृत वाहनतळच नाहीत. मुक्तिधामच्या वाहनतळावर बाहेरगावाहून आलेल्या वाहनांची गर्दी असते. तर सिन्नर फाटा वाहनतळावर कुठलीही सुविधा नसून ते शहरापासून दूर असल्यानेही तेथे पार्किंग होत नाही. उड्डाणपुलाखाली पार्किंग होत होती; मात्र तेथे सध्या भाजीबाजार असल्याने पार्किंगसाठी जागाच नाही.

शंभर वाहनांवर कारवाई
चार दिवसांपासून बिटको चौक, मुक्तिधाम, रेजिमेंटल प्लाझा, शिवाजी पुतळा, डॉ. आंबेडकर चौक, वास्को चौक परिसरात कारवाई सुरू आहे. वाहने उचलून आणत चालकांकडून वाहतूक शाखेचे 100 व महापालिकेचे 150 असे 250 रुपये वसूल केले जात आहेत. परवाना, कागदपत्रे नसल्यास अधिक दंड घेण्यात येत आहे. 21 जूनला 27, 22 ला 53, 24 ला 27, तर मंगळवारी (दि. 25) दुपारी एक वाजेपर्यंत 23 अशा सुमारे शंभर वाहनांवर कारवाई झाली.

आवाज उठवणार
महापालिकेने वाहनतळाच्या पर्यायी व्यवस्थेपूर्वीच वाहनांवर सुरू केलेली दंडात्मक कारवाई चुकीची आहे. या कारवाईबाबत आपण प्रभाग समितीच्या सभेत आवाज उठवणार आहे. कोमल मेहरोलिया, नगरसेविका