आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशवंत मंडईच्या जागेवर भव्य वाहनतळाचा प्रस्ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील सर्वात महत्त्वाच्या रविवार कारंजा चाैकात राेजच हाेणाऱ्या वाहतूक काेंडीवर ताेडगा म्हणून यशवंत मंडई इमारतीत दीड हजार वाहन क्षमतेचे बहुमजली वाहनतळ उभारण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साकडे घातले जाणार अाहे. पक्षाच्या स्थानिक नगरसेविका सुरेखा भाेसले यांनी तसा प्रस्ताव ठाकरे यांना सादर केला जाणार असून, त्यांच्या परवानगीनंतर संबंधित प्रस्ताव महासभेत धाेरणात्मक निर्णयासाठी सादर केला जाणार अाहे.

नाशिक शहरातील बेशिस्त वाहतुकीला अाळा घालण्यासाठी प्रबाेधन म्हणून ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क अाकारत असून, नाशिक फर्स्ट या संस्थेची संकल्पना राज ठाकरे यांच्या प्रयत्नातून बालवयापासूनच वाहतुकीच्या नियमांचे शिक्षण शिस्तीत वाहन चालवण्याचे धडे मिळणार अाहेत. एकीकडे, शिस्तबद्ध वाहतुकीसाठी प्रयत्न हाेत असले तरी बेशिस्त वाहतुकीचे मूळ वाहने रस्त्यात इतस्तत: लावण्यात दडले अाहे. खासकरून मूळ नाशिक, जुने नाशिक तथा गावठाण परिसरात जागेची अडचण असल्यामुळे वाहनधारक वाटेल तेथे गाड्या लावून खरेदी किंवा कामासाठी जातात. परिणामी, वाहतूक काेंडी नित्याची झाली असून, त्यावर ताेडगा म्हणून या भागात बहुमजली वाहनतळाची गरज निर्माण झाली अाहे. परंतु, गावठाण भागात सरकारी जागेची अडचण असल्यामुळे वाहनतळासाठी विकास अाराखड्यात अारक्षित जागाही ताब्यात घेण्यात पालिकेला अपयश येत अाहे. या पार्श्वभूमीवर रविवार कारंजा चाैकातील जीर्ण झालेल्या यशवंत मंडईसारख्या इमारतीचा वापर वाहनतळासाठी करण्याचा पर्याय वापरला तर त्याचा फायदा सर्वच नाशिककरांना हाेणार अाहे. ही बाब ठाकरे यांच्या निदर्शनास अाणून दिली जाणार अाहे.

व्यावसायिकांनाही फायदा
यशवंत मंडईची तीन मजली इमारत नगरपालिकेच्या काळापासून अाहे. तिच्या बांधकामास जवळपास ५० वर्षे झाली असून, सद्यस्थितीत तिची दुरवस्था झाली अाहे. तळमजल्यावर अतिक्रमणे करून मूळ साच्यात धाेकेदायक बदलही केले गेले अाहेत. विशेष म्हणजे, या इमारतीत मूळ भाडेकरूंची संख्या जेमतेम २० टक्क्यांपर्यंतच असून, ८० टक्के पाेटभाडेकरू अाहेत. ही बाब महापालिकेच्या लक्षात अाणून देण्यासाठी मूळ भाडेकरूचे नाव सध्या त्याच्या गाळ्यात व्यवसाय थाटणाऱ्या अन्य पाेटभाडेकरूंचे व्हिजिटिंग कार्ड फलकांची माहिती गाेळा करण्यात अाली अाहे. या इमारतीचा गैरवापर हाेत असल्यामुळे ती पाडून तळमजल्यापासून सहा मजली इमारत उभी करण्याचा प्रस्ताव अाहे. तळमजल्याच्या पुढील भागात २०-२५ गाळे थाटून मूळ भाडेकरूंना द्यावेत, असेही प्रस्तावात अाहे. या वाहनतळाचा फायदा रविवार कारंजापासून मेनराेड, सराफ बाजार, भद्रकालीतील व्यापारीवर्गासह ग्राहकांना हाेईल. तसेच, या भागाची भयंकर काेंडीतूनही मुक्तता हाेईल.

‘बीअाेटी’वर वाहनतळ सर्वांनाच उपयुक्त
यशवंत मंडईचा पुनर्विकास करून ‘बीअाेटी’वर वाहनतळ नाशिककर व्यापारीवर्गाला उपयुक्त ठरेल. नागरिकांना किफायतशीर दरात सहज वाहन ठेवता यावे मुख्य चाैकातील वाहतूक समस्या सुटावी, हा उद्देश त्यामागे अाहे. सुरेखा भाेसले, नगरसेविका, मनसे