आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हार्ट आॅफ सिटी’लाही पुन्हा अतिक्रमण अन‌् पार्किंगचा छेद...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिक शहराच्या हॉर्ट ऑफ सिटी मानल्या जाणाऱ्या कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर, सीबीएस परिसरात रस्त्यांवरील अतिक्रमणे, पार्किंगची डाेकेदुखी कायम अाहे. सर्रासपणे हाेणाऱ्या नियमांच्या पायमल्लीबाबत महापालिका प्रशासन अन् वाहतूक पोलिसांकडून मात्र ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतली जात असल्याने वाहनचालक, विद्यार्थी, पादचाऱ्यांची रस्ता सुरक्षितता धाेक्यात अाली अाहे. विशेष म्हणजे, महापालिकेचे मुख्यालय अन् जिल्हा सत्र न्यायालयाच्या समाेरील ‘नाे पार्किंग झाेन’मध्येच उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे राेज माेठ्या प्रमाणावर वाहतूक काेंडी हाेत असतानाही कारवाई केली जात नसल्याने अाश्चर्य व्यक्त हाेते. रस्त्यांचा श्वास गुदमरण्यास जबाबदार असलेली अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग स्पाॅट्सवर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझोत...
शहराचा स्मार्ट विकास होण्यासाठी महापालिका प्रशासनासमोर कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर परिसराचे उत्तम मॉडेल आहे. प्रशस्त काँक्रिटीकरण केलेले रस्ते, सौंदर्यीकरण केलेले दुभाजक, पथदीप व्यवस्था आदी कारणांमुळे हा परिसर स्मार्ट परिसर म्हणून ओळखला जाताे. मात्र, पालिकेच्या अतिक्रमण विभाग अन् वाहतूक पाेलिसांच्या दुर्लक्षामुळे ही अाेळख पुसट हाेऊ लागली अाहे. ‘डी.बी. स्टार’ प्रतिनिधीने परिसरात पाहणी केली असता, विविध व्यावसायिकांकडून थेट रस्त्यापर्यंत हाेणाऱ्या अतिक्रमणांमुळे तसेच, ठिकठिकाणच्या अनधिकृत पार्किंगमुळे या परिसरातील रस्त्यांचाही श्वास गुदमरला असल्याचे चित्र दिसून अाले.

मॉडेल कॉलनी, संपूर्ण कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर, महापालिका मुख्यालय, मेळा बसस्थानक, सीबीएस बसस्थानक, जिल्हा सत्र न्यायालय परिसर तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातही हेच चित्र दिसून अाले. परिणामी, खासगी कार्यालये, दुकाने, हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालयांसमाेर राेजच कित्येक वेळ वाहतूक काेंडी हाेत असून, अपघातांचे प्रमाणही वाढतेच अाहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, ज्यांच्यावर कारवाईची जबाबदारी असते, त्या महापालिका मुख्यालयासमाेरच राेज ‘नाे पार्किंग झाेन’मध्ये वाहनांची रांग लागलेली असते. वाट्टेल तेथे हाेणाऱ्या पार्किंगमुळे परिसरात वाहतुकीचा खाेळंबा नित्याचाच झाला अाहे.

पादचाऱ्यांनी जायचे तरी कसे अन‌् कुठून...?
कॅनडाकाॅर्नर, माॅडेल काॅलनी परिसरातील काही मिठाई विक्रेत्यांनी थेट फुटपाथपर्यंत बस्तान मांडले आहे. विशेष म्हणजे, या दुकानांत येणारे ग्राहकही अापली वाहने दुकानासमाेरील रस्त्यावरच उभी करीत असल्याने अन्य पादचाऱ्यांना येथून जायचे तरी कसे, असा प्रश्न पडतो.

अपघात झाल्यास जबाबदार काेण?
पादचाऱ्यांच्या सुविधेसाठी महापालिका प्रशासनाकडून पदपथांची निर्मिती करण्यात अाली अाहे. मात्र, अतिक्रमणांमुळे तसेच पदपथांवरच वाहने पार्किंग करण्यात येत असल्यामुळे रस्त्यावरूनच जीव धाेक्यात घालून मार्गक्रमण करावे लागते. अशा वेळी अपघात झाल्यास जबाबदार काेण, असा प्रश्न अनेक नागरिकांनी उपस्थित केला अाहे.