आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parking Problem In Nasik City News In Divya Marathi

अारके ते महाबळ चाैक रस्त्याजवळील इमारतींना पार्किंगच नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वाहतुकीची काेंडी साेडविण्याच्या दृष्टीने रविवार कारंजा ते महाबळ चाैकादरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले अाहे. त्यासाठी काेटी ८० लाख रुपये खर्च करण्याची तयारी केली अाहे. हा रस्ता रुंद हाेणार असला तरीही परिसरातील बहुतांश इमारतींना पार्किंगची व्यवस्थाच नसल्यामुळे संबंधित इमारतींत येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यावरच पार्क केली जाणार अाहेत. त्यामुळे रुंदीकरणाचा उपयाेग हाेईल का, याबाबत शंका उपस्थित हाेत अाहे.

महाबळ चौक ते धुमाळ पॉइंट, अशाेक स्तंभ ते रविवार कारंजा अाणि
रविवार कारंजा ते महाबळ चाैक अशा तीन टप्प्यांत रविवार कारंजा परिसरातील रस्त्यांचे कांक्रिटीकरण प्रस्तावित हाेते. सिंहस्थापूर्वीच पहिल्या दाेन टप्प्यांचे काँक्रिटकरण झाले असून, अाता तिसऱ्या टप्प्याला प्रारंभ करण्यात अाला अाहे. रविवार कारंजा ते महाबळ चौक या रस्त्याचा सद्यस्थितीत रविवार कारंजाकडून येण्यासाठी एकेरी वापर केला जात आहे. हा रस्ता नेहमीच वाहतुकीच्या खोळंब्याने व्यापलेला असतो. प्रमुख बाजारपेठ याच रस्त्यावर असल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात वाहने येतात. त्यामुळे या रस्त्याचेही साडेसात मीटरपर्यंत काँक्रिटीकरण करून उर्वरित दुतर्फा रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. संबंधित रस्त्याच्या दुतर्फा सध्या माेठ्या प्रमाणात वाहने उभी असतात. परिसरातील इमारती अाणि दुकानांसमाेर पुरेशी पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने वाहने रस्त्यावर उभी करण्याशिवाय पर्याय उपलब्ध राहत नाही. महापालिकेने या रस्त्याचे रुंदीकरण केल्यानंतर त्यावर वाहने उभे राहणार नाहीत, अशी काेणतीही व्यवस्था करण्यात येत नाही. तसे नियाेजनही नाही. त्यामुळे हा रस्ता पुन्हा एकदा पार्किंगच्या वाहनांनी व्यापला जाण्याचीच अधिक शक्यता अाहे.

- रहिवासी इमारती : प्रत्येक२५० चाैरस मीटर जागेवरील बांधकामासाठी एक चारचाकी दाेन दुचाकी पार्किंगची जागा बंधनकारक.
- डिपार्टमेंटल स्टाेअर्स, दुकाने : प्रत्येकी७५ चाैरस मीटर बांधकामासाठी एक चारचाकी दाेन दुचाकीच्या पार्किंगची जागा असावी.
- शैक्षणिक संकुल : १५०चाैरस मीटर बांधकामासाठी एक चारचाकी चार दुचाकींसाठी पार्किंग गरजेची.
- दवाखाने अाणि वैद्यकीय अास्थापना : प्रत्येकी१० बेडसाठी चारचाकी दुचाकींसाठी पार्किंग.
- शासकीय, निमशासकीय, खासगी अास्थापना : प्रत्येक१०० चाैरस मीटर जागेवर बांधकामासाठी एक चारचाकी, चार दुचाकींची पार्किंग
- गुदाम अाणि ठाेकवस्तू साठवणूक : प्रत्येक१०० चाैरस मीटर जागेवरील बांधकामासाठी एक चारचाकी दाेन दुचाकींसाठी पार्किंग अावश्यक.
रामटेकडीचा प्रस्ताव कागदावरच
रविवार कारंजा परिसरातील यशवंत मंडईत भाजीबाजाराची व्यवस्था करण्यात आली. परंतु, भाजीविक्रेते रस्त्यावरच बसतात, त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो. ही बाब हेरून पुण्यातील गुलटेकडीच्या धर्तीवर पंचवटीत रामटेकडी नावाने भाजीबाजार विकसित करण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी प्रशासनाने सादर केला. परंतु, तो अद्याप कागदावरच आहे.

मे नंतर हाेणार रस्ता खुला
रविवारकरंजा रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने हा रस्ता साधारणत: मेपर्यंत बंद ठेवण्यात अाला अाहे. या तीन महिन्यांच्या काळासाठी प्रशासनाच्या वतीने वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात अाले अाहेत.