आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थासाठी अाठ ठिकाणी तात्पुरती वाहनतळ उभारणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थासाठी शहरालगत अाठ ठिकाणी बाह्य वाहनतळ उभारली जाणार असून, यात सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे ५, पालिकेमार्फत वाहनतळे उभारली जाणार अाहेत. पालिका क्षेत्रातील वाहनतळांना मान्यतेचा प्रस्ताव स्थायी समितीसमाेर गुरुवारी मंजुरीसाठी ठेवला जाईल.
सिंहस्थानिमित्त तीन प्रमुख पर्वण्यांसाठी काेट्यवधी भाविक येणार अाहेत. परराज्यातून येणाऱ्या भाविकांची गर्दी शहराबाहेर थाेपविण्यासाठी अाठ बाह्य वाहनतळे उभारली जातील. ही ठिकाणे निश्चित झाली असून बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या वाहनतळांत विल्हाेळीनजीकच्या राजूर बहुला येथे ५२ हेक्टर, शिलापूर येथे २१ हेक्टर, माेहदरी घाट शिवारालगत ३५ हेक्टर, गंगापूर गावाजवळील दुगावला हेक्टर, तर त्र्यंबकराेडवरील खंबाळे येथे हेक्टर येथे वाहनतळ उभारले जातील. दरम्यान, अाडगावलगत ४४ हेक्टरवर १६ हजार क्षमतेचे वाहनतळ उभारले जाईल. पेठराेडचे वाहनतळ १३ हेक्टरवर पाच हजार क्षमतेचे अाहे. याबराेबरच दिंडाेरीराेडलगत २४ हेक्टर क्षेत्रावर नऊ हजार वाहने उभी राहू शकतील. बाह्य वाहनतळावरून शहरातील वाहनतळापर्यंत राज्य परिवहन महामंडळ पर्यायी सरकारी वाहनातून येता येईल. त्यानंतर भाविकांना गाेदाघाटापर्यंत जाण्यासाठी निश्चित केलेल्या मार्गावरून ये-जा करता येईल, असे अधीक्षक अभियंता उत्तम पवार यांनी सांगितले.