आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकांनी बंद पाडलेले पार्किंगचे निकृष्ट काम सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कुंभमेळ्यात भाविकांच्या वाहनांसाठी सुरू असलेले पार्किंगचे निकृष्ट काम शनिवारी म्हसरूळ परिसरातील नागरिक नगरसेवकांनी बंद पाडूनही हे काम आहे त्या स्थितीत रविवारी सुरू असल्याचे दिसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. आरोग्य विद्यापीठासमोरील जागेत हे काम सुरू आहे. यासंदर्भात पालिका आयुक्तांकडे नगरसेवक गणेश चव्हाण यांनी तक्रार केली आहे.

म्हसरूळ शिवारात डोंगर पायथ्याशी पार्किंगची जागा सपाटीकरण आणि मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. दिवसभरात शंभर ट्रक मुरूम येथे टाकण्यात येतो. मात्र, संबंधित ठेकेदाराने मातीमिश्रित मुरूम टाकल्याचे गावकर्‍यांच्या निदर्शनास आले. पावसाळ्यात मातीमिश्रित मुरुमाने चिखल होऊन वाहन त्यात अडकण्याची शक्यता आहे. म्हसरूळ ग्रामस्थांनी ही बाब नगरसेवक गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठेकेदारास लक्षात आणून दिली तरीही तसेच काम सुरू राहिल्याने नगरसेवक चव्हाण यांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली असता त्यांनी येथे पाहणी करण्याचे आश्वासन दिले.

तक्रारीची दखल नाही
पार्किंग जागेवर निकृष्ट काम सुरू असल्याचे संबंधित अभियंत्यास कळवूनही त्याची दखल घेतली जात नाही.- गणेश चव्हाण, नगरसेवक