आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डी प्लस झाेनला सवलत, नाशिकचे उद्याेग संकटात, विषय कॅबिनेटसमाेर ठेवणार - महाजन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मराठवाडा विदर्भातील उद्याेगांना गतवर्षी वीजदर सवलतीत झुकते माप दिल्याने अाधीच उत्तर महाराष्ट्रातील उद्याेजक अडचणीत सापडलेले असताना सरकारने अाता अादिवासी क्षेत्रातील ‘डी प्लस’ झाेनमधील उद्याेगांनाही मराठवाड्याप्रमाणेच वीजदर अनुदान लागू करण्याचा निर्णय घेतला अाहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील उद्याेगांवर संक्रात येण्याची भीती व्यक्त हाेत अाहे. विशेष म्हणजे मराठवाड्याप्रमाणेच उत्तर महाराष्ट्रातील उद्याेगांनाही वीजदर सवलत देण्याची मागणी थेट ऊर्जामंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे नाशिकचे उद्याेजक दाेन वर्षांपासून करीत असतानाही त्यावर विचार हाेत नसला तरी ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील उद्याेजकांनी अशीच मागणी सहा महिन्यांपूर्वी करताच ती शासनाने तातडीने मान्य केली अाहे. नाशिकला पिछाडीवर टाकण्याचाच तर हा डाव नाही ना? असा सवाल पुन्हा एकदा चर्चिला जाऊ लागला अाहे. 


शासनाने २४ नाेव्हेंबरला काढलेल्या अादेशाप्रमाणे अाता वाडा अाैद्याेगिक वसाहतीतील उद्याेगांना मराठवाड्याप्रमाणेच युनिटमागे एक रुपया १७ पैसे वीजदर अनुदान मिळणार अाहे. ते नाशिककरिता केवळ ४५ पैसे अाहे. महत्त्वाचे म्हणजे, काेणत्याही नव्या उद्याेगाकरिता हेच अनुदान मराठवाडा अाणि वाडा अाैद्याेगिक वसाहतीत एक रुपया ९२ पैसे असेल तर नाशिकच्या उद्याेगांना ते मात्र ९५ पैसे अाहे. 


या दर तफावतीचा परिणाम नाशिकच्या उद्याेगांचे उत्पादन मूल्य वाढते राहणार असून, जीवघेण्या स्पर्धेत ते टिकू शकणार नाहीत. स्टील उद्याेग यात प्रचंड हाेरपळणार असून, दर परवडत नसल्याने सरकार कित्येकदा मागण्या करूनही मागणी मान्य करीत नसल्याने माेठे तीन प्रकल्प तातडीने बंद करण्याच्या हालचाली संबंधितांनी सुरू केल्या अाहेत. तसे झालेच तर हजाराे कामगार बेराेजगार हाेतील अाणि त्यांची कुटुंबे उघड्यावर येण्याची भीती व्यक्त केली जात अाहे. 


विदर्भ मराठवाड्यातील उद्याेगांना विशेष वीजदर सवलत देण्याची घाेषणा शासनाने केल्यानंतर माेठ्या प्रमाणावर नाशिक उत्तर महाराष्ट्रातील कामगार, उद्याेजकांत संताप पहायला मिळाला हाेता. यानंतर वाढत्या दबावावर उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी एक त्रिसदस्यीय समिती या प्रकरणात नेमली, ज्यात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनही हाेते. त्यांनी उत्तर महाराष्ट्रालाही वीजदर सवलत दिली, पण ताेकडी अाहे. पाचशे काेटी रुपयांची अतिरिक्त सवलत पुरवणी प्रस्तावाद्वारे देणार असल्याचेही जाहीर केले गेले, मात्र विधिमंडळाची दाेन अधिवेशने हाेऊनही या सबसिडीचे काय झाले हे शासनाने सांगितलेले नाही. जिल्ह्याचे पालक या नात्याने अाता या गंभीर प्रकरणात गिरीश महाजन यांची जबाबदारी वाढली अाहे. 


वीज दरातील फरकामुळे नाशिकमधील विशेषत: स्टील उद्योगांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे नाशिकवर याचा प्रतिकूल परिणाम होत उद्योग बाहेर जाण्याची शक्यता आहे. म्हणून मराठवाड्यातील आणि वाडा एमआयडीसीतील उद्योजकांना वीजदरात दिलेली सूटच नाशिककर उद्योजकांना दिली पाहिजे, या मताचा मी आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे, पुन्हा करेल. कॅबिनेटच्या बैठकीत हा विषय मी मांडणार असून, यातून नक्कीच योग्य तोडगा काढला जाईल. 
-गिरीश महाजन, पालकमंत्री, नाशिक 

बातम्या आणखी आहेत...