आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेचा मनसे, राष्ट्रवादीला पुन्हा दणका, नगरसेविका सुरेखा नागरे रंजना बाेराडे सेनेत दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मनसे राष्ट्रवादीला दणके देण्याचे काम शिवसेनेने अव्याहतपणे सुरूच ठेवले असून, साेमवारी (दि. १८) मनसेच्या सुरेखा गाेकुळ नागरे राष्ट्रवादीच्या रंजना प्रकाश बाेराडे या नगरसेविकांसह अन्य काही पदाधिकाऱ्यांनी मुंबईत शिवबंधन बांधले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश साेहळा झाला.
महापालिकेच्या अागामी निवडणुकीनिमित्त शिवसेनेने अन्य पक्षातील नगरसेवकांना सामावून घेण्याची नीती अवलंबली अाहे. त्याचाच एक भाग म्हणून अाजवर मनसेचे माजी महापाैर अॅड. यतिन वाघ, स्थायी समितीचे माजी सभापती रमेश धाेंगडे, सिडकाे प्रभाग समितीचे माजी सभापती अरविंद शेळके, नगरसेविका रत्नमाला राणे, राष्ट्रवादीचे गटनेते विनायक खैरे, विधानसभा निवडणुकीस बंडखाेरी केलेले नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, माकपच्या नगरसेविका नंदिनी जाधव यांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला अाहे. हीच मालिका पुढे चालू ठेवत साेमवारी नागरे बाेराडे यांनी सेनेत प्रवेश केला. संपर्कप्रमुख अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रवेश साेहळ्यावेळी रिपाइं युवा जिल्हा अध्यक्ष ललित पाटील, श्याम साबळे, मानव अधिकार शहराध्यक्ष हृषिकेश वर्मा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन पिंगळे, योगेश चव्हाणके यांनीही पक्षप्रवेश केला. राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, राजू लवटे, माजी महापाैर विनायक पांडे, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, देवानंद बिरारी आदी उपस्थित होते.
मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या नगरसेविका सुरेखा नागरे राष्ट्रवादीच्या नगरसेविका रंजना बाेराडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेचे ३०, मनसेचे २६...
अन्यपक्षातून अालेल्या नगरसेवकांचा विचार करता शिवसेनेचे संख्याबळ अाता ३० नगरसेवकांवर गेल्याचे चित्र अाहे. याशिवाय, मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दाेन नगरसेवकांचे पद विभागीय अायुक्तांनी रद्द केले अाहे. मनसेच्या १४ नगरसेवकांनी अाजवर शिवसेना अाणि भाजपमध्ये प्रवेश केला अाहे. गेल्या निवडणुकीत मनसेचे ४० नगरसेवक निवडून अाले हाेते. अाता मात्र केवळ २६ नगरसेवक उरले अाहेत. तर राष्ट्रवादीचे दाेन नगरसेवक कमी झाले.

अाणखी तिघे गळाला
२४ एप्रिल दरम्यान तीन नगरसेवकांना सेनेत प्रवेश दिला जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. सध्या मनसेला गळती लागली असली तरी संभाव्य प्रवेश काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे असल्याचे कळते.