आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचवटी’तील प्रवाशांच्या संतापामुळे कसा-यात अधीक्षकांनी काढला पळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड- मकरसंक्रांतीनिमित्त कामकाज अाटाेपून लवकर घरी परतण्यासाठी मुंबईतून पंचवटी एक्स्प्रेसने निघालेल्या प्रवाशांना तासभर कसारा स्थानकावर ताटकळत राहावे लागले. मालगाडीला पुढे काढण्यासाठी ही गाडी कसाऱ्याच्या अलीकडे २५ मिनिटे स्थानकावर ४० मिनिटे थांबवून ठेवल्याने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्‍यांचा रुद्रावतार पाहून कसाऱ्याच्या स्टेशन अधीक्षकांनी कार्यालय साेडून पलायन केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.
नाशिककडून मुंबईला जाणाऱ्या पंचवटीला वर्षभर दुरांताे एक्स्प्रेसमुळे विलंब हाेताे अाहे. अाठवड्यातून किमान चार दिवस ही गाडी मुंबईत उशिरा पाेहाेचते. त्याविराेधात वारंवार अांदाेलन, तक्रारी कराव्या लागल्या. खासदार हेमंत गाेडसे यांच्या मध्यस्थीनंतर ही गाडी वेळेत पाेहाेचू लागली. मुंबईकडे जातानाचा त्रास कमी झालेला असतानाच गेल्या काही दिवसांपासून नाशिककडे येणारी ही गाडी मालगाडी पुढे पाठवण्यासाठी कसारा, इगतपुरी स्थानकावर थांबवण्यात येत असल्याने प्रवाशांना घरी पाेहचण्यास दरराेज तासभर उशीर हाेऊ लागला अाहे. गुरुवारी तर त्याचा अतिरेक झाला. कसाऱ्यानजीक वेळेत अालेली पंचवटी २५ मिनिटे थांबवण्यात अाली. परिणामी ती रात्री ८.२० एेवजी वाजता कसारा स्थानकात पाेहचली. संतप्त प्रवाशांनी त्वरित स्टेशन अधीक्षकांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. हे पाहून अधीक्षकांनी कार्यालय साेडून पळ काढला. प्रवाशांनी माेटरमनकडे विचारणा करून अधीक्षक येत नाहीत ताेपर्यंत गाडी साेडू देण्याची भूमिका घेतली. मात्र, अधीक्षक अालेच नाहीत. त्यामुळे वैतागलेल्या प्रवाशांनी गाडी साेडण्यास सांगिल्याने ८.३० वाजता कसारा साेडणारी पंचवटी ९.३० वाजता तेथून निघाली नाशिकराेडला १०.४५ वाजता पाेहचली.