आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानसेवा प्रारंभासाठी प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू, निमाचा पुढाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकहून देशातील महत्त्वाच्या शहरांकरिता विमानसेवा सुरू हाेण्यासाठी नाशिककर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू झाले अाहे. नाशिकमधून विमानाद्वारे देशातील कुठल्या शहरांत अापण जाता, किती वेळा जाता अाणि कुठल्या शहराकरिता विमानसेवेची अापणास गरज अाहे यांसह कुठल्या शहरातून अापण विमानसेवेचा वापर करून शहरात येता, अशा स्वरूपाची तपशीलवार माहिती घेण्यात येत अाहे. नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनकडून हे अाॅनलाइन सर्वेक्षण केले जात असून, संकलित केलेली माहिती विमान कंपन्यांपर्यंत पाेहाेचविली जाणार अाहे. यातूनच विमान कंपन्यांकडे नाशिकमधून देशांतर्गत सेवा सुरू करण्याची मागणी केली जाणार अाहे.

केंद्र सरकारने प्रादेशिक विमानसेवेला बळकटी देण्याचे नवे धाेरण स्वीकारले असून, यात अशी सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना विशिष्ट अनुदानही दिले जाणार अाहे. यामुळे नाशिककरांना असलेली विमान सेवेची प्रतीक्षा संपेल; मात्र त्याकरिता विमान कंपन्यांना नाशिकहून प्रवासी जाण्याची येण्याची संख्या प्राथमिक स्तरावर लक्षात अाणून देणे अावश्यक असल्याचे लक्षात अाल्याने विविध संघटनांसाेबत खासदार हेमंत गाेडसे यांनी बैठका घेतल्या. यात किती प्रवासी वर्षभरात देऊ, याबाबतची हमी विमान कंपन्यांना दिल्यास ही सेवा लवकर सुरू हाेऊ शकेल हा उद्देश यामागे अाहे. याच विषयाला अनुसरून क्रेडाई निमा यांच्या पदाधिकारी सदस्यांची बैठकही झाली असून, त्यानुसारच अाता हे सर्वेक्षण सुरू झाले अाहे.

सर्वेक्षणास मिळताेय चांगला प्रतिसाद
विमानसेवा सुरू हाेण्यासाठी सरकार दरबारी ज्या मान्यता अडकलेल्या हाेत्या, त्या सगळ्या अाता मिळाल्या अाहेत. त्यामुळे नाशिकमधून सेवा सुरू केल्यास व्यवसाय मिळेल, याची हमी विमान कंपन्यांना अापण दिली तर ही सेवा लवकरात लवकर सुरू हाेऊ शकेल. म्हणून हे सर्वेक्षण महत्त्वाचे अाहे, ज्याला चांगला प्रतिसाद मिळताे अाहे. - मंगेश पाटणकर, उपाध्यक्ष, निमा

असे हाेता येईल सर्वेक्षणात सहभागी
विमानसेवेचावापर गरजेचा असलेल्या सर्वच नाशिककरांना या अाॅनलाइन सर्वेक्षणात सहभागी हाेता येईल. त्यासाठी https://docs.google.com/form/d/e/1FAIpQLSewGwd4vYtsQwacVgJcjxXL3KUM3DZxLb1040zKn4tljv8N_w/viewform या लिंकवर क्लिक करून अापली विमानसेवेची गरज, काेणत्या शहरासाठी, किती वेळा जा-ये हाेते अशी सविस्तर माहिती काही मिनिटांत देता येईल. शहरात विमानसेवा सुरू हाेण्यासाठी ती महत्त्वाची ठरू शकेल.
बातम्या आणखी आहेत...