आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Passing out Parade Held At Combat Army Aviation School

आनंदोत्सव पासिंग आउट परेडचा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड : येथील गांधीनगर विमानतळावर कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (कॅट्स)तर्फे लष्करातील हेलिकॉप्टर पायलट्सचे अठरा आठवड्यांचे प्रशिक्षण शनिवारी पूर्ण झाले. त्यानंतर झालेल्या पासिंग आउट परेडवेळी चीता, चेतक आणि ध्रुव हेलिकॉप्टरच्या थरारक कसरतींसह विविध प्रात्यक्षिके प्रशिक्षणार्थींनी सादर केली. यशस्वी प्रशिक्षणार्थींना लेफ्टनंट जनरल बी. एस. सच्चर यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले. प्रशिक्षणार्थींनी जल्लोष करून पासिंग आऊट परेडचा आनंद लुटला. या वेळी प्रशिक्षणार्थींच्या पालकांनीही या आनंदोत्सव सहभाग घेतला.