आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पासपोर्ट कार्यालयात सर्व्हर डाऊन; नागरिकांची गैरसाेय, कर्मचाऱ्यांची मनमानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - परदेशात जाण्यासाठी पासपाेर्ट अावश्यक असताे. नागरिकांना ताे सुलभपणे मिळावा यासाठी केंद्र शासनाने सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, नाशिकरोड येथील पासपोर्ट कार्यालयाच्या मनमानी कारभारामुळे परदेशवारी करणाऱ्या नागरिकांना कठोर परीक्षेला सामोरे जावे लागत आहे.
 
गुरुवारी या कार्यालयातील सर्व्हर डाऊन असल्याने उत्तर महाराष्ट्रासह मुंबईहून आलेल्या नागरिकांना हात हलवत जावे लागले. त्यामुळे या ठिकाणी आलेल्या नागरिकांनी संबंधित कंपनी आणि तेथील कर्मचाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
 
नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना परदेशात जाण्यासाठी नाशिकरोड येथील पासपोर्ट कार्यालयातून पासपोर्ट तयार करून घ्यावा लागतो. पासपोर्टसाठी बहुतांश व्यक्ती या आपल्या लहान मुलांसह आलेल्या असतात. मात्र या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे पासपोर्टसाठी मुलाखतीला आलेल्या नागरिकांना अक्षरश: कार्यालयाबाहेरील पायऱ्यांवर दोन-दोन तास बसावे लागते. गुरुवारी तर सर्व्हर डाऊन असल्यामुळे मुलाखती आणि कागदपत्र तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना माघारी फिरावे लागले. त्यामुळे या व्यक्तीना मानसिक, आर्थिक, शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले.
 
या कार्यालयाला अधिकार द्यावेत
गुरुवारी सिस्टिमबंद झाल्याने त्रास वाढला आहे. येथील कार्यालय ठाणे येथील कार्यालयावर अवलंबून असल्याने येथील कार्यालयालाही अधिकार द्यावे.
- आकाश बच्छाव
 
जळगावहून परत यावे लागेल
पासपोर्ट काढण्यासाठी मला १३ एप्रिल रोजी सकाळी बोलविण्यात आले होते. त्यासाठी मी जळगावहून खास आलो. मात्र, येथे आल्यानंतर तुम्ही पुढच्या आठवड्यात या असे सांगण्यात आले. त्यामुळे मी नाराज झालो आहे.
- मनोज जैन
 
सर्व्हर डाऊनमुळे वेळ वाया गेला
मुंबई, ठाणेकार्यालयात पासपोर्टसाठी उशीर लागणार असल्याने नाशिक कार्यालयात वेळ घेतली. मात्र, या ठिकाणी गुरुवारी सर्व्हर डाऊन असल्याने नुकसान झाले.
- प्रणाली गावड
 
ठाणे येथील कार्यालयात विचारून सांगतो
शासकीयकार्यालयात पारदर्शक पद्धतीने कामकाज केले जाते. मात्र, नाशिकरोड येथील पासपाेर्ट कार्यालयात दिवसात ३५० पासपोर्ट तयार करण्यात येतात. या ठिकाणी माध्यम प्रतिनिधी गेल्यानंतर त्यांना हिन दर्जाची वागणूक दिली जाते. आतमध्ये जाण्यासाठीही ठाण्यावरून परवानगी घेतली जाते. प्रत्येक बाब ही ठाणे येथील कार्यालयातून नियंत्रित केली असल्याने तेथून परवानगी घेतली जाते. नाशिकराेड येथील कार्यालयाला ते अधिकार देण्यात यावे. पासपोर्ट काढण्यासाठी एका खासगी कंपनीला हा ठेका देण्यात आला आहे. संबंधित कंपनीने बाहेर बसणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र बसण्याची, पाणी पिण्याची सुविधा द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
 
बातम्या आणखी आहेत...