आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पतंजली’मधून युवकांना रोजगार, राज्यातील 28 ते 30 वयातील याेगप्रचारकांची हाेणार नियुक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - योगापाठोपाठ देशवासीयांना स्वदेशी वस्तू खरेदी करण्यासाठी पतजंली परिवाराने देशभरात जाळे निर्माण केले आहे. आता पतंजली परिवाराने युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रत्येक तालुक्यात योगप्रचारकांची नेमणूक करणार आहे. यासाठी या योगप्रचारकांना त्यांच्या कार्यानुसार ११ ते २१ हजार रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. यासाठी प्रचारकांची वयोमर्यादा १८ ते ३० असणे बंधनकारक असल्याने युवकांना पतंजलीमार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात येत आहे.
 
पतंजली परिवाराच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत देशातील प्रत्येक तालुक्यात योगप्रचारकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. योगप्रचारक बनू इच्छिणाऱ्या योगप्रचारकाला योग, आसनाविषयी माहिती असणे गरजेचे आहे. संस्कृत शिक्षकांची भरती होणार असून त्यांनीही संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हरिद्वार येथे पतंजली  संस्कृत गुरुकुलात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या १२ वी पास युवक युवतींनी नाव समितीकडे नोंदवावे. अध्यात्म, वैदिक व ऋषी परंपरेवर विश्वास ठेऊन आजन्म ब्रह्मचारी व्रतधारण करून ऋषी ऋषिका बनून मानव जातीची सेवा करू इच्छिणाऱ्या बारावी, ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट युवक युवतींनी पतंजली वैदिक गुरुकुलम, पतंजली योगपीठ, हरिद्वार येथे प्रवेश घेऊन शिक्षण घेण्याचे आवाहन स्वामी रामदेव बाबा यांनी केले आहे.

पूर्णकालिक सेवा देऊ इच्छिणारे ५० वर्षांवरील बंधू-भगिनींनी नाव जिल्हा पतंजली योग समिटी तथा भारत स्वाभिमान यांच्याकडे नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दहावी पास युवकांची हाेणार भरती
योग प्रचारकासाठी नेमणूक झाल्यावर युवक युवतीला पाच दिवसांचे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांनी एक महिन्यापर्यंत जिल्हा समितीसोबत योग शिबिराचे कार्य करावयाचे आहे. त्यानंतर त्यांची निवड २५ जून २०१७ रोजी शेगाव येथे मुख्य निवड कार्यशाळेसाठी होणार आहे. त्याचप्रमाणे पतंजली सिक्युरिटी सर्व्हिसेसने कमीत कमी दहावी पास असणाऱ्या युवकांची लवकरच भरती होणार आहे. यासाठीही नावाची नोंद जिल्हा पतंजली योग समितीकडे करण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...