आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाैचकूपात रुग्णाचा पाय, सुटका २० तासांनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्हा रुग्णालयातील शाैचालयात रुग्णाचा पाय अडकल्याने रुग्णालयात शनिवारी गाेंधळाची स्थिती हाेती. सायंकाळी वाजेच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत तब्बल २० तासांनी या रुग्णाची सुटका केली. हा गाेंधळ सुरू असतानाच एका मद्यपी रुग्णाने अाॅपरेशन थिएटरमध्ये हातात चाकू घेत दहशत निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न रुग्णालय अावारातून पाळलेल्या माकडाची वनविभागाने केलेली सुटका हा दिवसभर चर्चेचा विषय ठरला. जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागले असतानाच, या घटनेमुळे आता आपत्कालीन परिस्थितीमध्येही हे रुग्णालय सुरक्षित नसल्याचा या घटनेवरून उघड झाले अाहे. दाेन महिन्यांपासून रुग्णालयात अर्धांगवायू अाजारावर उपचार घेत असलेले बेघर रुग्ण समाधान वानखेडे ( ५९) हे शनिवारी रात्री च्या सुमारास शौचालयात गेले असता तेथे ते पाय घसरून पडले त्यांचा पाय शाैचकूपात अडकला. आरडाओरड केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ताे फोल ठरला. शनिवारी सकाळी रुग्णाचा पाय काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अखेर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. जी. एम. होले यांनी अग्निशमन दलास कळवले. काही वेळात अग्निशामक दलाचे चार जवान रुग्णालयात दाखल झाले. शौचालयाच्या अरुंद जागेमुळे जवानांना काम करण्यास अडचणी निर्माण झाल्या. जवानांनी शौचालयातील भांडे कापून पाय काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही असफल ठरला. त्यानंतर संपूर्ण काँक्रीट फाेडूनही पाय निघत नसल्याने वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णाच्या पायास भूल देऊन बचावकार्य सुरू करण्यात अाले. मात्र, अखेर संपूर्ण काँक्रीट तोडल्यानंतर हे बचावकार्य यशस्वी झाले. तब्बल वीस तास सुरू असलेल्या बचावकार्यास अखेर यश आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अग्निशमन दलाचे अनिल महाजन, डी. बी. गायकवाड, ए. टी. पाटील, सुधाकर रणधवे, बी. पी. परदेशी, डी. आर. लासुरे, अय्याज शेख, मुस्ताक पाटकरी, जयेश सांतरस अादींसह दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न केले.
मद्यपी रुग्णाकडून दहशत
जिल्हा रुग्णालयात एका मद्यपी रुग्णाने ऑपरेशन थिएटरमध्ये घुसून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकाराने परिचारिका वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. झटापटीमध्ये त्याच्या हाताला चाकू लागला. पकडून ठेवलेल्या संशयितास सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पाळलेल्या माकडाची वनविभागाकडून सुटका
जिल्हा रुग्णालय आवारातील पोलिस चौकीसमोर एमएच ३० एके ७०३० या क्रमांकाच्या दुचाकीला साधारण दीड वर्षाचे एक माकड बांधलेले अाढळून आले. काही नागरिकांनी ही बाब वनविभागात कळविल्यानंतर वनरक्षकांनी या माकडाची सुटका केली. माकड पाळलेल्या व्यक्तीचा मुलगा अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याने संशयितास समज देऊन सोडून देण्यात आले. माकडाच्या कानात बाळी टोचली आहे. दोन दिवसांपासून हे माकड भुकेले असल्याने नागरिकांनी दिलेले पाणी आणि भाकरी त्याने काही वेळात फस्त केली.