आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री गुरुजी रुग्णालयामार्फत झाेपडपट्टी, अादिवासी पाड्यांवर रुग्णसेवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - समाजाचा सहभाग अाणि सहकार्यातूनच उभ्या राहिलेल्या श्रीगुरुजी रुग्णालयाने दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याबरोबरच समाजातील दुर्बल, वंचित घटकांसाठी काम करीत त्यांना सक्षम बनविण्यासाठीचे सामाजिक दायित्व अंगिकारले अाहे. याच उपक्रमांतर्गत शहरातील दाेन झाेपडपट्टीत (सेवा वस्ती) आणि वनवासी पाड्यातील (अादिवासी) लोकांसाठी दर अाठवड्याला फिरत्या अाराेग्य पथकाद्वारे तपसाणी करून त्यांच्यावर उपचारांचे काम सुरू करण्यात अाले अाहे. केवळ उपचारांपुरतेच मर्यादित राहता या पाड्यांवर सर्वागीण ग्रामविकासासाठी सेवा संकल्प अभियान हाती घेण्यात अाले अाहे.
वैद्यकीय व्यवसायातील सेवा गुण अग्रभागी ठेवून काम करणारे श्री गुरुजी रुग्णालय हे डाॅ. बाबासाहेब अांबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान, अाैरंगाबाद यांच्यामार्फत चालविले जात अाहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गाेळकवलकर(गुरूजी) यांच्या नावाने हे रुग्णालय नाशकात सुरुवातीला खासगी जागेत तर गेल्या चार वर्षांपासून भाेंसला सैनिकी विद्यालयाच्या प्रागंणात सुरू अाहे. गेल्या अकरा वर्षांपासून पूर्णवेळ डाॅक्टर अत्यंत माफक मानधनावर सेवाभाव मनात ठेवून हे अत्याधुनिक रुग्णालय चालवित अाहेत. अाैरंगाबाद येथील डाॅ. केशव बळीराम हेडगेवार रुग्णालयाकडून शहरासह ग्रामीण भागात वेगवेगळ्या ३६ सेवा प्रकल्पांमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जात अाहेत. याच धर्तीवर नाशकातही उप्रकमांना प्रारंभ करण्यात अाहे. आरोग्यसेवेतील अभिनव उपक्रमाबराेबर मनाची निर्मळता आणि इतरांना स्नेहभावनेने जोडण्याच्या सेवाव्रतींच्या स्वभावाने रुग्णालयाचे अनेकांशी नाते जोडले गेले आहे.

पाड्यांवर अाराेग्य सेवा : सातपूरयेथील प्रबुद्धनगर उपनगर भागातील अाम्रपाली झाेपडपट्टी येथे रुग्णालयातर्फे अाठवड्यातून एक दिवस सुसज्ज माेबाइल व्हॅन (फिरते रुग्णालय) पाेहचते. सकाळी ते सायं. वाजेपर्यंत लहान मुलांसह वृद्धांपर्यंत सर्वांची अाराेग्य तपासणी केली जाते. काेणाला दुर्धर अाजार अाढळल्यास त्यास याेग्य उपचाराचा सल्ला शक्य झाल्यास अाैषधे माफक दरात उपचार केले जातात. याबराेबरच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काैटूंबे पेठ तालुक्यातील करंजखेड येथेही अाराेग्य सेवा पुरविली जाते. अवघ्या दाेन महिन्यांत हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात अाले अाहे. याचबराेबर शिक्षण, किशोरी विकास प्रकल्प, माता बाळ संगोपन केंद्र, अल्पबचत गट, शुद्ध पाणीयोजना, शेती अशा अनेक अर्थांनी सर्वांगीण विकासाचे प्रकल्प राबविण्यात येत अाहे.

सेवाव्रतींच्या मदतीने प्रकल्प
^रुग्णालयाच्या संपर्कात अालेल्या विविध संस्थांचे ज्येष्ठ नागरिक अाणि उपचार घेतलेले रुग्ण सेवाव्रती म्हणून अाराेग्यसेवेत हिरिरीने सहभागी हाेत असून त्यांच्या मदतीने हे प्रकल्प राबविले जात अाहेत. या सेवेत ज्यांना तन-मन अाणि धनाने सहभागी व्हायचे असेल त्यांनीही संपर्क साधल्यास या कार्याला अाणखी बळकटी प्राप्त हाेईल. - डाॅ. राजेंद्र खैरे, समन्वयक
बातम्या आणखी आहेत...