आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नगरसेवक पवन पवार यांचे भाजपमध्ये वेलकम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक येथील गुन्हेगारी पार्श्वभूभी असलेले अपक्ष नगरसेवक पवन पवारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नाशिकच्या आगामी महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने पवन पवार यांना आपल्‍या पक्षात घेतल्‍याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पवन पवार यांच्यावर पोलिस कृष्णकांत बिडवे यांच्या हत्याकांडतील प्रमुख आरोपी असल्‍याचा आरोप आहे. खंडणी मागितल्याप्रकरणीही त्‍यांच्‍यावर दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पवार हे नाशिक रोड येथील अपक्ष नगरसेवक आहेत. त्‍यांच्‍या या पक्ष प्रवेशाने नाशिककरांच्‍या भुवया उंचावल्‍या आहेत.
- मीडिया रिपोर्टनुसार पवन पवार यांच्‍यावर नाशिकरोड, उपनगर व देवळाली पोलिस स्‍टेशनमध्‍ये सुमारे 20 गुन्‍हे दाखल आहेत.
- दोन वर्षांपूर्वी तत्‍कालीन डीसीपी स्‍वामी यांनी पवार यांना तडिपार केले होते.
- पोलिस कृष्णकांत बिडवे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी.
- व्यावसायिकांकडून खंडणी मागितल्याचे दोन गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
- दुहेरी हत्याकांडातल्या आरोपींना मदत केल्याने एसपींकडून कसून चौकशी करण्‍यात आली.
- कृष्णकांत बिडवे हत्याकांडप्रकरणी मोक्का अंतर्गत गंभीर कारवाई
- राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांशी पंगा घेण्यासाठीच पवन पवार यांना पक्षात घेतले गेले, अशी चर्चा नाशिककरांमध्ये आहे.
पुढे पाहा,संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...