आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - अाधीचखर्चिक असलेली बाईक अाता काॅलेजकुमारांच्या ,खिशांना अाणखी चाट लावणार अाहे. विविध प्रकारच्या शैक्षणिक खर्चाने गांजलेल्या महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांना ५०० रुपये प्रतिवर्ष वाहनतळ शुल्कही द्यावे लागणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ अधिकार मंडळाने हा निर्णय घेतला असून, त्याची अद्याप
महाविद्यालयांना सक्ती केलेली नसली, तरी विद्यार्थ्यांना काही दिवसांत हे शुल्क भरावेच लागण्याची चिन्हे अाहेत.
विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांसह मान्यताप्राप्त संस्थांना नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू होणार अाहेत. डिसेंबरला काढलेल्या अध्यादेशानुसार या ‘फतव्या’तील
मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी त्वरित करण्याचे आदेश आहेत. त्यातील प्रमुख तरतुदी अन्यायकारक असल्याचा सूर अंमलबजावणीच्या अाधीच उमटू लागला अाहे.
सायकलने येणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना हे शुल्क लागू होणार नाही. मात्र, इतर नियमित विद्यार्थ्यांना महाविद्यालयात वाहन आणायचे असल्यास ५० रुपये मासिक किंवा ५००
रुपये वार्षिक शुल्क आकारण्यात येईल. विद्यार्थी शुल्क भरण्यास सक्षम नसल्यास त्यांना शुल्क माफीचीही तरतूद नाही. सहा महिन्यांचे िकमान ३०० रुपयेकिंवा तेही शक्य
नसल्यास दिवसाला तीन रुपये शुल्क आकारावे, असे आदेश देण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या या अनोख्या फतव्यातून महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना
मात्र सूटमिळाली असून, त्यांना वाहनतळ शुल्क नसेल. कामानिमित्त महाविद्यालयात येणाऱ्यांना दुचाकीसाठी १० रुपये द्यावे लागणार आहेत. कोणत्याही प्रकारची आणि
कोणाचीही चारचाकी वाहने महाविद्यालयात प्रवेश करू शकणार नाहीत, असाही एक अजब नियम आहे.
या शुल्क आकारणीतून वाहनतळाची दैनंदिन स्वच्छता, पावसाळी पाणी, वाहनांची व्यवस्था, फरश्यांची डागडुजी, वाहनतळांची प्रकाश योजना, वाहन राखणीसाठी
नेमलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार अादी खर्च केला जावा, असेही नमूद केलेले आहे. महाविद्यालयांच्या वाहनतळ क्षमतेवर शुल्क आधारित असल्याने त्याचे प्रमाण कमी जास्त
होऊ शकते.
जागा द्या, मग शुल्क घ्या
-महाविद्यालयांतमुळात पार्किंगला जागाच नाहीत. त्यासाठी ठरावीक जागा द्यावी. मगच त्या पार्किंगवर खर्च करायचा की नाही हे ठरवावे. जागाच नाही तर पैसे कसले
द्यायचे? चिन्मयगाडे, राष्ट्रवादीविद्यार्थी काँग्रेस
विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊ
-यापूर्वीसंस्थेने असे शुल्क घेतलेले नाही. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांची परिस्थिती सारखी नसते. याबाबत स्थानिक व्यवस्थापन समितीच्या बैठकीत चर्चा करू.
शक्यतो विद्यार्थी हिताचाच निर्णय घेतला जाईल. प्राचार्यडॉ. दिलीप धोंडगे, के.टी. एच. एम. महाविद्यालय
संस्था स्तरावरच होणार योग्य तो निर्णय
-पार्किंगविषयीमहाविद्यालयात बरेच प्रश्न आहेत. ते साेडविण्यासाठी या शुल्काची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, हा निर्णय सर्वस्वी संस्थेच्या स्तरावरच हाेणार आहे.
तसेच, या निर्णय प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांचादेखील विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. प्राचार्यव्ही. एन. सूर्यवंशी, एचपीटी-आरवायकेमहाविद्यालय
प्रवेश फी कशासाठी?
-महाविद्यालयातसगळ्या सुविधांसाठी पैसे घेतले जातात. मग अचानक हा शुल्क कसले? हे विद्यार्थ्यांवर अन्यायकारकच आहे. प्रेरणाजैन, विद्यार्थीप्रतिनिधी, एचपीटी
कॉलेज
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.