आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘पेईंग घोस्ट’मुळे आयुष्याला नवे वळण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- बरेच दिवसांनी मराठी चित्रपटात एक वेगळं तंत्र ‘पेईंग घोस्ट’ या चित्रपटाच्या निमित्ताने बघायला मिळणार आहे. व्हीएफएक्स इफेक्ट हे तंत्र या चित्रपटात मोठ्या प्रमाणात वापरण्यात आलं आहे. आठ भूतांसाठी मोठ्या कोशल्याने हे तंत्र हाताळल्याने चित्रपटात गंमत येते, असे या चित्रपटाचे कलाकार आणि तंत्रज्ञांनी ‘दिव्य मराठी’ला सदिच्छा भेट दिली त्यावेळी सांगितले.
मराठीतील मोठी स्टारकास्ट घेऊन पेईंग घोस्ट हा चित्रपट मे अखेरीस रसिकांच्या भेटीला येतो आहे. चाळीत राहणाऱ्या माधव माटेगावकर याची ही कथा आहे. माधवच्या एकटेपणाचा चाळीतील इतर रहिवासी कसा फायदा घेतात. त्याचे घर वापरतात, घरातील वस्तू वापरतात, शेजारच्या गणपुल्यांनी तर त्याच्या घरातील पाणीच बंद केलेले असते. त्यामुळे तो वैतागलेला असतो.
चाळीतीलच वृंदा माधवच्या प्रेमात असते. पण, माधव ऑफिसमधल्या माधवीच्या प्रेमात पडतो. त्यांचं लग्नही होतं. एक दिवस भूत असलेले पती-पत्नी आणि त्यांच्या सहा मुली माधवच्या आयुष्यात येतात आणि त्याचं आयुष्यच बदलतं. पण, या भुतांबद्दल माधवीला कळलं तर ही भीती माधवच्या मनात कायम असते आणि ज्या काही गमती-जमती घडतात ते चित्रपटात बघतानाच मजा येते. या चित्रपटात अमेश कामत, स्पृहा जोशी, पुष्कर श्रोत्री, शर्वाणी पिल्लई, अनिता दाते-केळकर, समीर चौघुले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर, सुश्रृत भागवत यांनी चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात एक दहीहंडीचं गाणंही बघायला मिळणार आहे. हे गाणं शरद केळकरने रंगवलं आहे.

पायरेटेड सिडीज खरेदी करण्याची जबाबदारी रसिकांचीच...
‘दिव्यमराठी’ला कलाकारांनी भेट दिल्यावर प्राईमटाईम सोडून इतर वेळी प्रेक्षक सिनेमागृहाकडे फिरकत नसल्याच्या मुद्द्यावर प्रमुख चर्चा झाली. यावर चित्रपटाचा तरुण निर्माता रोहन शिंदे याने सांगितले की, यासंदर्भात आम्ही सगळ्या निर्मात्यांनी एकत्र येत प्रथम पायरेटेड सिडीजवर पूर्णत: बंदी घालण्यात यावी, या आयशयाचे निवेदन सरकार दरबारी दिले आहे. तसेच ज्या-ज्या वेबसाईटवर चित्रपट लगेच उपलब्ध होतो त्या वेबसाईटवर सायबर क्राईमद्वारे कारवाई करून त्या वेबसाईट्स तत्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आल्याचेही रोहन याने सांगितले. याची प्रक्रिया शासनदरबारी सकारात्मकतेने सुरू असल्याचेही कलाकारांनी व्यक्त केले. तसेच चांगले चित्रपट रसिकांनी सिनेमागृहातच बघावे. पायरेटेड सिडीज खरेदी करू नये, ही रसिकांचीही जबाबदारी असल्याचेही व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...