आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे इंजिनच्या पंख्यात अडकून मोर गतप्राण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निफाड - भुसावळकडून मुंबईकडे जाणार्‍या गरीबरथ एक्स्प्रेसच्या इंजिनच्या पंख्यात अडकलेल्या मोराचा अखेर मृत्यू झाला. गरीबरथ एक्स्प्रेस उगाव ते कुंदेवाडीदरम्यान आली असता, रेल्वे रूळाजवळील मोराला इंजिनची धडक बसल्याने हा मोर इंजिनच्या पंख्याला अडकला होता.

कुंदेवाडी रेल्वे स्थानकावर ही गाडी आली असता, स्टेशन मास्तर सक्सेना यांच्या ही बाब लक्षात आली. मृतावस्थेतील मोराला तत्काळ बाहेर काढण्यात आले. ही घटना वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर सोमवंशी, पगारे, वडघुले आदींनी कुंदेवाडी येथे धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. निफाडच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉ. नीता निकम व डॉ. प्रदीप झोड यांनी केलेल्या शवविच्छेदनात मोराच्या मानेचे हाड व अन्ननलिका, श्वासनलिका तुटल्याचे आढळले. रोपवाटिकेजवळ या मृत मोराचे दफन वनकर्मचार्‍यांनी केले.