आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pencil Pictures Workshop Issue At Nashik, Divya Marathi

आकारातून साकारली व्यक्तिचित्रे, पेन्सिल चित्रांच्या कार्यशाळेस प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लाइन अन् शेडिंगचा वापर करून पेन्सिलच्या माध्यमातून तंत्रयुक्त पद्धतीने विविध प्रकारच्या आकारांतून विद्यार्थ्यांनी आदश्र व्यक्तिचित्र साकारले. निमित्त होते, रेखाटन ट्रस्टतर्फे आयोजित पेन्सिल चित्रांच्या कार्यशाळेचे.

गोळे कॉलनीतील मंदार अपार्टमेंटमध्ये रेखाटन ट्रस्टतर्फे तीनदिवसीय पेन्सिल चित्रांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन ट्रस्टचे अध्यक्ष किशोर नागपुरे यांच्या हस्ते झाले. या वेळी अभिजित बिरारी, पूजा कोठावदे, भारत नागपुरे, योगेश नागपुरे यांसह माजी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमधील उपजत कलागुणांना या कार्यशाळेच्या माध्यमातून वाव मिळेल, असा विश्वास नागपुरे यांनी या वेळी व्यक्त केला. सकाळी 9 ते 11 व सायंकाळी 6 ते 8 या वेळेत ही कार्यशाळा होणार असून, विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन पेन्सिलच्या माध्यमातून व्यक्तिचित्र साकारण्याचा प्रयत्न केला. चित्रकार अशोक नागपुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदश्रन केले. संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना साहित्य पुरविले जाणार आहे.