आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Help 50 Thousand Rupees To Bhikale Family

शहीद भिकले कुटुंबाला ५० हजारांची मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जम्मूपरिसरात अतिरेक्यांच्या गोळीबारात मे २०१४ मध्ये वीरमरण आलेल्या हडलगे (ता. गडहिंग्लज, जि. काेल्हापूर) या गावाचे सुपुत्र शहीद जवान उत्तम बाळू भिकले यांच्या कुटुंबीयांना फेसबुकवरील ‘सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज’ या फोरमच्या वतीने रविवारी (दि. १४) ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली.

या फाेरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते ही रक्कम प्रदान करण्यात आली. हडलगे गावच्या सरपंच कमल नाईक फोरमचे मुंबईतील सदस्य वैभव कांबळे शहीद जवान भिकले यांची आई लीलावती उपस्थित हाेत्या. यामध्ये शहीद जवानाचे वडील बाळू सत्तूराम भिकले यांना २५ हजार तर पत्नी सुगंधा उत्तम भिकले यांना २५ हजार अशी रक्कम देण्यात आली.
फेसबुकवरील या अभियानांतर्गत तरुणांच्या सहकार्यातून देशासाठी बलिदान केलेल्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाते. अशाप्रकारे मदत केलेले शहीद उत्तम भिकले यांचे सातवे कुटुंब आहे.
कतारस्थित भारतीयांचे सहकार्य : नाेकरीनिमित्तकतार येथे स्थायिक झालेले लक्ष्मीकांत पोवनीकर यांनी या फोरमला देणगी दिलेली सर्व रक्कम भिकले कुटुंबीयांना देण्यात आली. पोवनीकर यांनी या फोरमने हाती घेतलेल्या शहीद जवान निधी, मराठवाडा दुष्काळ निधी, अनाथालयांना मदत अशा उपक्रमांना आर्थिक मदत केली आहे.
हडलगे (ता. गडहिंग्लज, जि. काेल्हापूर) : शहीदजवान उत्तम बाळू भिकले यांच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत देण्यात आली. याप्रसंगी भिकले कुटुंबीयांसमवेत प्रमोद गायकवाड, गावाच्या सरपंच कमल नाईक आदी.
या शहिदांच्या कुटुंबांना आजवरदिली आर्थिक मदत : सुधाकरसिंह - मध्यप्रदेश, हेमराजसिंह - शेरखेरारी (उत्तर प्रदेश), भाऊसाहेबतळेकर -कोळगाव (अहमदनगर), शहीदकुंडलिक माने - पिंपळगाव(कोल्हापूर ), शहीदगणेश अहिरराव -वडाळा (जाळगाव), शहीदशशिकांत पवार - बेटावद(धुळे ) शहीदउत्तम भिकले - हडलगे(कोल्हापूर)