आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक महापालिकेच्या महापौरपदासाठीची महाआघाडी नाशिककरांना नापसंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक महापालिकेच्या महापौरपदासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी अपक्षांना बरोबर घेत महाआघाडी करत मनसेने आपले महापैरपद राखले. मात्र, तब्बल ९६ टक्के नाशिककरांनी या महाआघाडीवर नापसंतीची मोहोर उमटवली.
महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला नाकारत नाशिककरांनी ४० नगरसेवकांचे दान मनसेच्या झोळीत टाकले. किंबहुना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भुजबळांवर टीका करत त्यावेळी मतांचा जोगवा मागितला होता. आता मात्र त्याच राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ मनसेने घेतल्याने नाशिककरांनी स्पष्ट नापसंती दर्शविली आहे.

मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकत्र येत जी महाआघाडी झाली, या संदर्भात ‘दिव्य मराठी’ने आपल्या वाचकांना तीन प्रश्नांद्वारे आवाहन केले होते. त्यात तब्बल ९६ टक्के वाचकांनी या महाआघाडीला नापसंती दर्शविली, तर याचा महायुतीला फायदा होणार असून, आगामी निवडणुकीवरही वाईट परिणाम होणार असल्याचे मत नोंदविले. सुमारे २००० नाशिककरांनी ‘दिव्य मराठी’च्या संबंधित मोबाइल क्रमांकांवर एसएमएस आणि व्हॉट‌्सअॅपवर नोंदविलेल्या मतांची ग्राफिक्सच्या माध्यमातून ही मांडणी...