आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे दिवसांचे वेतन कापणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘इंटक’ या एसटी कामगार संघटनेने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला असून, त्यांचे अाठ दिवसांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. एसटीच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाकडून विभागाला तसे पत्रही प्राप्त झाले अाहे.

एसटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ‘इंटक’ या एसटी कामगार संघटनेने डिसेंबर महिन्याच्या पहिल्या अाठवड्यात दीड दिवस संप केला हाेता. त्यानंतर सरकारकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात अाले. संपमागे घेण्यात आला. या संपात राज्यांच्या सर्व विभागांतील हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे एसटीला विभागात ६० लाखांचे अार्थिक नुकसान सहन करावे लागले. मुळातच हा संप बेकायदा असल्याचे एसटी महामंडळ प्रशासनाने त्याचवेळी स्पष्ट करून संपात सहभागी झालेल्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत िदले हाेते. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाने संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचे अाठ दिवसांचे वेतन कपात करण्याचा निर्णय नुकताच घेतला अाहे.