आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटीविरोधात पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्हे, मुख्यमंत्र्यांबरोबर होणार बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्थानिकसंस्था कर रद्द करण्याठी भारतीय जनता पक्षाकडून केवळ घाेषणा सुरू असून, विविध महापालिकांत व्यापाऱ्यांवर हा करवसुलीसाठी कठोर कारवाई सुरू झाली आहे. या कारवाईविरुद्ध प्रचंड रोष असतानाही सरकारकडून काहीच पावले उचलली जात नसल्याने एलबीटीविरोधी आंदोलन राज्यात पुन्हा पेटण्याची िचन्हे निर्माण झाली आहेत. २७ ते २९ जानेवारीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फेडरेशन आॅफ असोसिएशन मर्चंट्स (फाम)च्या शिष्टमंडळाची बैठक होण्याची अपेक्षा असून, त्यानंतरच आंदोलनाचा िनर्णय घेतला जाणार आहे.

एलबीटी रद्द करावा, या प्रमुख मागणीकरिता व्यापारी संघटनांचे शिष्टमंडळ ‘फाम’च्या नेतृत्वाखाली नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांना भेटले. एलबीटी रद्द करण्याबाबतचे सादरीकरणही त्यांच्याकडे केले. दरम्यान, २१ ते २६ जानेवारीपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस विदेश दाैऱ्यावर असल्याने त्यांच्याशी या काळात बैठक होऊ शकत नाही. मात्र, २७ ते २९ जानेवारीदरम्यान बैठक निश्चितपणे होण्याची आशा असून, त्याकरिता २६ महापालिकांतील प्रतिनिधींनी तयार राहावे, अशा सूचना ‘फाम’तर्फे देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत महिनाअखेरीस होणाऱ्या बैठकीमध्ये तरी एलबीटीच्या समस्येवर ठोस स्वरूपाचा तोडगा काढण्यात येईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

व्यापाऱ्यांमध्ये फसवणुकीची भावना
भाजपचेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीपूर्वी आपल्या भाषणांतून एलबीटीला ‘लुटाे बाँटाे टॅक्स’ म्हणत होते. ‘तुम्ही सत्ता भाजपच्या हातात द्या, आमचे सरकार पहिला िनर्णय जर कोणता घेणार असेल, तर तो एलबीटी रद्द करण्याचा,’ असे आश्वासन देत होते. मात्र, सत्ता आल्यानंतर दोन महिने उलटून गेले, तरी केवळ एलबीटी रद्द करणार हीच त्यांची भाषा असून, व्यापाऱ्यांवरील कारवाई मात्र सातत्याने वाढत असल्याने राज्यभरातील व्यापाऱ्यांमध्ये याप्रश्नी आपली फसवणूक झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

कारवाई चिंतेचा विषय
एलबीटीविवरणपत्र त्या अनुषंगाने होणारी कठोर कारवाई हा िचंतेचा विषय असून, राज्यातील बहुतांश महापालिकांत त्यातही नाशिक आणि ठाणे महापालिकांतही अशी कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांत संतापाचे वातावरण असून, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर आंदोलनाबाबत दिशा स्पष्ट केली जाणार असल्याचे ‘फाम’ने स्पष्ट केले आहे.