आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Well Respond To Divya Marathi's Anupama Shadi.com Website

विवाहेच्छुकांची लगीनघाई, ‘दिव्य मराठी’ अनुपम शादी डॉटकॉमच्या उपक्रमास प्रतिसाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लगीनघाईया दोन दिवसीय प्रदर्शन आणि वधू-वर मेळावा उपक्रमाचा रविवारी लक्षिका मंगल कार्यालयात समारोप झाला. त्यात सुमारे बाराशे विवाहेच्छुकांनी सहभाग घेतला. ‘दिव्य मराठी’ अनुपम शादी डॉटकॉमच्या उपक्रमात विवाहापूर्वी आणि विवाहानंतर लागणाऱ्या बारीकसारीक प्रत्येक गोष्टींचा समावेश होता. अगदी घर खरेदीपासून विवाहासाठी लागणरे दागिने, कपडे आणि केटरर्सनेही सहभाग घेतला होता.
कार्यक्रामासाठी लक्षिका मंगल कार्यालय, निर्माण ग्रुप, तनिष्क ज्वेलर्स, व्हीएलसीसी, सोनी गिफ्ट्स, प्रभुज एथनिक वेअर, चॉकलेट हॉलिडेज यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले.

या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी (रविवारी) सर्वशाखीय ब्राह्मण समाजातील विवाहेच्छुकांनी भाग घेतला. रात्री १० वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमात शहर आणि परिसरातील विविध स्तरांतील नागरिकांनी हजेरी लावली. गोल्डन बिट्स ऑर्केस्ट्रॉने लोकांचे मनोरंजन केले. दिवसभर सुरू असलेल्या विवाहोत्सुकांच्या नोंदणीने कार्यक्रमास रंगत आली. अनुपम शादी डॉट कॉमच्या संस्थापिका मंदाकिनी लोळगे, संजय लोळगे, दीपक पाटील, प्रशांत शेटे, सोनाली पाटील यांचा यात सहभाग होता.

विवाहासाठी सगळ्यात महत्त्वाचा असणारा कपडे खरेदीचा कार्यक्रमासंबंधी प्रीतम जुंदरे आणि प्रभुज एथनिक वेअर आयोजित विवाह कलेक्शन या फॅशन शोने उत्तरे दिली. लगीन सराईचा उत्सव हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. त्यात कित्येक दिवस पूर्ण परिवार तयारी करत असूनही शेवटच्या क्षणी काहीतरी राहिल्याचे आठवते. असे होऊ नये म्हणून ‘दिव्य मराठी’ आणि अनुपम शादी डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपतक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सोनार समाज आणि ब्राह्मण समाजाच्या सुमारे १२०० विवाहोत्सुकांनी सहभाग घेतला.
विवाह समुपदेशक मोहन गोखले यांचे मार्गदर्शन

नोंदणीकृतसहभागींच्या परिचयानंतर मुंबई येथील प्रसिद्ध विवाह समुपदेशक मोहन गोखले यांनी ‘विवाह एक संस्कार’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. विवाह ही औपचारिकता नसून जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक मुलाने ‘आपण जवाबदारी स्वीकारत असल्याचे’ लक्षात घ्यायला हवे, त्याचबरोबर ‘आपण नव्या कर्तव्याची सुरुवात करत असल्याचे’ मुलीने लक्षात घ्यायला हवे.

नवविवाहित जोडप्याने त्यांच्यातील मतभेद आपल्यापुरतेच मर्यादित ठेवावे. त्याचा बाऊ केल्यास लोक वाईट गोष्टीची चर्चा करण्यास पटकन तयार असतात. त्यातून परिस्थिती आणखी बिघडू शकते.

चार लोकांत असताना कधीही फटकन आपल्या जोडीदाराला बोलू नका, अपमान करू नका. तुम्ही वेगवेगळे नसून एक आहात हे नेहमी लक्षात ठेवा. अपमान दोघांचा होतो.