आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व्हर डाउनमुळे गॅस ग्राहक त्रस्त, सिलिंडरसाठी एसएमएस नोंदणीला प्रतिसाद नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गॅसकंपन्यांनी आपले सॉफ्टवेअर अपडेशनचे काम सुरू केले. पण, दरम्यानच्या काळात ग्राहकांना सिलिंडरची नोंदणी कशी करता येईल याची कुठलीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. अखेर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी भारत गॅस आणि हिंदुस्थान गॅस या दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकांनाच याबाबत जाब विचारल्यानंतर त्यांनी कंपनीचे सर्व्हर डाउन असल्याचा खुलासा करत बुधवारपासून नियमित सिलिंडर मिळेल, असे आश्वासन दिले आहे.

घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी कंपन्यांनी आपले सॉफ्टवेअर अद्ययावत करण्याचे काम सुरू केले आहे. पण, ग्राहकांना याबाबत कुठलीही माहिती देण्यात आली नाही. शिवाय सिलिंडरची बुकिंग करण्यासाठी कंपनीस एसएमएस केल्यास त्यास कुठलाही प्रतिसादच मिळत नव्हता. अनेक ग्राहकांनी जानेवारीला सिलिंडरची बुकिंग एसएसमने केली. पण, अद्यापही या ग्राहकांना बुकिंगचा संदेश किंवा कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. शिवाय सोमवारी आणि मंगळवारी ग्राहकांनी सिलिंडरसाठी एसएमएस केले त्यालाही प्रतिसादच मिळत नसल्याने एजन्सीकडे तक्रार केल्यानंतर त्यांनीही तुम्हाला सिलिंडर देता येणार नसल्याचे सांगितल्याने चक्रावलेल्या ग्राहकांना आता काय करावे, असा प्रश्न पडला. कंपनीचा अधिकारी परवानगी नसल्याने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी समोर येत नसल्याने ग्राहकांचा संभ्रम कायम असून, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनीच कंपनीच्या क्षेत्रीय व्यवस्थापकांशी चर्चा केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सॉफ्टवेअर अपडेशनचे कारण दिले.

आता २५ रुपयांची एजन्सीकडून मागणी
अनुदानित सिलिंडरची किंमत मंगळवारी (दि. २०) ७५५ रुपये होती. परंतु, वितरण एजन्सी किंवा संबंधित वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून ७८० रुपयांची मागणी केली जात आहे. पावती देताना मात्र ७५५ रुपयांचीच दिली जात आहे. गॅस एजन्सी चालकांच्या मनमानीला आळा घालण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

पावती देताना जादा पैशांची मागणी
-माझे भारत गॅस कंपनीचे कनेक्शन आहे. अशोकनगर येथील एजन्सीत नोंदणी आहे. या एजन्सीचे घरपोच वितरण करणारे कर्मचारी पावती देतात ७५५ रुपयांची ७८० रुपयांची मागणी करतात. संदीपतिवडे, त्रस्तग्राहक

ग्राहकांनी पुन्हा करावेत एसएमएस
मंगळवारीसायंकाळपासूनच सर्व्हर सुरू होणार असल्याचे कंपन्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी पुन्हा नोंदणीसाठी एसएमएस करावेत. त्यांना सिलिंडर मिळतील, असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले.