आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Permission For Teachers To Use Mobile In School Premises

शिक्षकांच्या हाती पुन्हा माेबाइल, शाळेत वापरण्यास मुभा, विद्यार्थ्यांवर मात्र निर्बंध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शाळा आणि महाविद्यालयीन आवारात विद्यार्थ्यांच्या हातात अाता सहजपणे माेबाइल दिसून येतात. मात्र, त्याचा गैरवापर होण्याच्या भीतीने शासनाने १८ फेब्रुवारी २००९ पासून शैक्षणिक संस्थांच्या अावारात मोबाइल वापरावर निर्बंध लादले हाेते. मात्र, सर्वत्र हाेणारा तंत्रज्ञानाचा वाढता वापर, इंटरनेटवर उपलब्ध हाेणारी शैक्षणिक माहिती याचा विचार करता शासनाने अाता शिक्षकांना मुख्याध्यापकांच्या परवानगीने शाळेच्या अावारात त्याच्या वापरास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षकांच्या हाती अधिकृतपणे मोबाइल दिसेल. शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांवर मात्र निर्बंध कायम ठेवले अाहेत.

राज्य शासनाने फेब्रुवारी २००९ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषद, पालिका हद्दीतील अनुदानित-विनाअनुदानित खासगी संस्थांच्या प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेच्या आवारात आणि वर्गामध्ये मोबाइल फोन वापरण्यासाठी बंदी घातली होती.

परवानगी घ्यावी लागेल
मोबाइलचा वापर फक्त शैक्षणिक साधन म्हणून करावा.
मुख्याध्यापकांची अाधी घ्यावी लागणार परवानगी.
शाळेच्या आवारातून बाहेरील व्यक्तीशी संभाषण टाळावे.
नियमांचे उल्लंघन झाल्यास शिक्षकांवर दंडात्मक कारवाई
माहिती तंत्रज्ञानाचा फायदा विद्यार्थ्यांपर्यंत
माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव शिक्षण क्षेत्रात दिसून येत अाहे. एखाद्या विषयाची सखोल व विस्तृत स्वरूपाची माहिती माेबाइलच्या माध्यमातून शिक्षकांना प्राप्त झाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांना हाेऊ शकताे, असा उदात्त विचार करून शासनाने शिक्षकांना मुख्याध्यापकांच्या मान्यतेने शाळेच्या आवारात आणि वर्गात अध्यापनासाठी मोबाइलचा वापर करण्याची मान्यता दिली आहे.