आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pest Control Contract,latest News In Divya Marathi

आजपासून औषध फवारणी बंद, पालिकेकडून पेस्ट कंट्रोल ठेक्यास मुदतवाढीच्या हालचाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने राबविल्या जाणाऱ्या मोहिमांकडे पालिकेचे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष झाल्याने शहरात डास, माशा वाढल्या आहेत. परिणामी संसर्गजन्य रोगग्रस्तांची संख्या वाढली आहे. त्यातच पेस्ट कंट्रोल ठेक्याची मुदत गुरुवारी (दि. 9) संपत असून, त्याला आता आठव्यांदा मुदतवाढ देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

गेल्या आठ महिन्यांपासून ठेकेदारांना मुदतवाढ दिली जात असून, ठेका देण्यासंबंधी किंवा पालिकेतर्फे मानधनावर कर्मचारी घेण्यासंबंधी कायमस्वरूपी निर्णयाची सर्वत वाट पाहत आहेत. ढगाळ हवामान, थोडा फार पाऊस आणि पावसाळी गटारी सफाईची कामे रखडल्याने डास, माशा वाढल्या आहेत. शहरातील मध्यवर्ती भागातील कचरा वेळीच उचलला जात नाही. गटारी साफ होत नाहीत, अनियमित घंटागाड्या अशा समस्या जुन्या नाशकात आहेत. कागदोपत्री पुरेशा घंटागाड्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या कमीच असल्याची तक्रार आहे.
गोदाकाठ परिसरदेखील याला अपवाद नाही. कीटकनाशक फवारणीत निष्काळजीपणा होत असल्याने डास वाढून शहरात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. पेस्ट कंट्रोलसाठी पालिकेने नेशन टेक्नो पेस्ट कंट्रोल, तसेच एस अँड आर पेस्ट कंट्रोल यांना ठेका दिला होता. मात्र, त्यांनी कामच केले नसल्याचा आरोप होतो. संबंधित ठेकेदारांच्या ठेक्याची मुदत ऑक्टोबर 2013 मध्ये संपली. त्यानंतर ठेकेदारांना महिन्याची मुदतवाढ दिली. निविदा प्रक्रिया राबवणे तसेच नवीन ठेकेदार नियुक्तीपर्यंत धूर आणि औषध फवारणीवर परिणाम होऊ नये म्हणून मुदतवाढीचा निर्णय घेण्यात येत आहे. आता त्यास आठ महिने उलटले असून, अद्याप योग्य ठेकेदार मिळालेला नाही. लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी पेस्ट कंट्रोल ठेकेदारामार्फत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानधनावर काम करून घेण्यासाठी ठरावही मंजूर झाला. मात्र, त्याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
आजसंपणार ठेक्याची मुदत :अनेक वर्षांपासून ठराविक ठेकेदारांनाच ठेका मिळतात अशी ओरड होती. त्यामुळे नवीन ठेकेदारांनी स्पर्धेत उतरावे आणि निकोप स्पर्धा व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र, आहे त्याच ठेकेदारांच्या निविदा मिळत असल्याने प्रशासनापुढे प्रश्न निर्माण होत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून एक-एक महिन्याची मुदतवाढ देण्यात येत असल्याने पेस्ट कंट्रोलच्या कामावर परिणाम होत असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. तसेच, आज ठेक्याची मुदत संपणार असून ठेकेदारास पुन्हा मुदतवाढ देण्याच्या हालचाली महापालिकेच्या वतीने सुरू झाल्या आहेत.
लाखोचा ठेका कशाला? शहरातगेल्या काही दिवसांपासून आैषध फवारणीच होत नाही. त्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. दर महिन्यास ठेकेदाराला लाखोंचा ठेका देण्याएवजी प्रशासनाने कर्मचाऱ्यांकडून मानधनावर काम करून घ्यावे. बाबाकोकणी, नागरिक