आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वाघाच्या मावशीची’ही वंशावळ अाता हाेणार जतन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  ‘वाघाची मावशी’ म्हणून अाेळख असलेल्या मनीमाऊच्या संवर्धनासाठी कॅट फॅन्सिअर्स असाेसिएशन अाॅफ इंडियाने वंशावळ जतन करण्याचे काम सुरू केले अाहे. याशिवाय मांजरींच्या संगाेपनासाठीची जागृतीही असाेसिएशनच्या वतीने करण्यात येणार अाहे. विशेष म्हणजे ही राष्ट्रीय स्वरुपाची संघटना सुरू करण्यात नाशिकच्या तरुणांचा पुढाकार घेतला अाहे. ‘पेट पॅरेंट डे’ निमित्त पाळीव प्राण्यांना पाळणाऱ्यांसाठी ही बाब सुखावह ठरणार अाहे. 
 
मांजरींची काळजी, संगाेपन अाणि संवर्धनासाठी ११० वर्षापासून जागतिक पातळीवर कॅट फॅन्सिअर्स असाेसिएशन अाॅफ वर्ल्ड ही संस्था कार्यरत अाहे. मार्जरसेवा करण्यात या संस्थेचे याेगदान माेठे अाहे. भारतात मात्र या कामासंदर्भात माेठी उदासीनता दिसते. ही बाब लक्षात घेऊन अांतरराष्ट्रीय संघटनेची परवानगी घेत नाशिकमधील अश्विन पंडित, राहुल चव्हाण, साकीत पठाण, समीर येवलेकर, अजिंक्य चाेपडे, ऋषिकेश काेरडे या तरुणांनी भारतात कॅट फॅन्सिअर्स असाेसिएशन अाॅफ इंडिया ही संस्था सुरू केली. या कामासाठी संबंधित तरुणांना सुनील धाेपावकर यांचा भक्कम पाठिंबा मिळत अाहे. 

भारतात मांजरींविषयीच्या जागृतीचा अभाव अाहे. त्यातच काही व्यावसायिकांनी चुकीच्या पद्धतीने ब्रिडिंग करण्याचा धडाका लावल्याने चांगल्या जातीही नष्ट हाेण्याची भीती व्यक्त केली जात अाहे. या पार्श्वभूमीवर काेणत्या जातीच्या मांजरीचे मेटिंग काेणत्या जातीशी करावे, ज्यामुळे सुदृढ पिलाचा जन्म हाेईल याविषयी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात येणार अाहे. यासाठी भारतीय मांजरींची वंशावळ जतन करण्यात येणार अाहे. कॅट सॅन्सिअर असाेसिएशन अाॅफ इंडिया संस्थेच्या माध्यमातून असाेसिएशन वंशावळ जतन करेल. त्यांची संपूर्ण माहितीचे संकलन करून अापल्या संकेतस्थळावर ती प्रसिद्ध करेल. मांजरींबराेबरच त्यांना पिले झाल्यानंतर त्याचीही नाेंदणी या निमित्ताने हाेणार अाहे. यासाठी मांजरीच्या मालकांना प्रमाणपत्रदेखील देण्यात येणार अाहे. 

मांजरींविषयीच्या जागृतीसाठी नुकताच नाशिकमध्ये परिसंवादही घेण्यात अाले. त्यात पावणेदाेनशे मांजरप्रेमींनी सहभाग नाेंदविला हाेता. येत्या २० मे राेजी पुढील परिसंवादाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. त्याला तब्बल ४०० मांजरप्रेमी उपस्थित राहणे अपेक्षित अाहे. 

मांजरींचे जतन एकमेव उद्देश 
^भारतीय वंशाच्यावा जातीच्या मांजरींचे जतन करण्याच्या उद्देशाने असाेसिएशन सुरू केली अाहे. यात काेणताही व्यावसायिक उद्देश नाही. भारतभरातील मांजरींची वंशावळ जतन करणे, मांजरींच्या अाराेग्याविषयी जनजागृती करणे, मांजरींचे अंतरराष्ट्रीय पातळीवर शाेध घेणे अादी कामे करताेय. -अश्विन पंडित, सचिव, कॅट फॅन्सिअर्स असाेसिएशन अाॅफ इंडिया 

न्यूटर मांजरींसाठी जागृती 
भारतीय मादी मांजरींना शारीरिक व्याधी अधिक असतात. विशेषत: गर्भाशयाशी संबंधित तसेच लिंगाशी संबंधित अाजार माेठ्या प्रमाणात असतात. असाेसिएशनच्या अभ्यासानुसार मांजरीचे मेटींग वर्षातून दाेन वेळेचा हाेणे अावश्यक असते. परंतु, काही मंडळी अापल्या व्यवसायासाठी अधिक वेळा मेटिंग करून तिच्या अाराेग्याशी खेळतात. ही बाब लक्षात घेऊन संस्थेतर्फे मार्गदर्शन करण्यात येते. इतकेच नाही तर मांजरीने प्रजाेत्पादनच करू नये म्हणून संस्थेतर्फे जागृती करण्यात येणार अाहे. प्रजाेत्पादन बंद केल्यास मांजरीची प्रतिकारशक्ती वाढते. या दृष्टीने अशा ‘न्यूटर’ मांजरींसाठी अंतरराष्ट्रीय दर्जाचे कॅट शाे घेऊन त्यात उंची बक्षिसे देण्याची संस्थेची याेजना अाहे. 

 
बातम्या आणखी आहेत...