आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाईच्या भीतीचा पेट्रोलपंपांवर भडका, पंपांवर वाहनधारकांच्या रांगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पेट्राेलपंपचालकांनीमंगळवार (दि. २६)पासून बेमुदत बंद करण्याची घाेषणा केल्याने टंचाईच्या धास्तीने साेमवारी शहरातील पंपांवर वाहनधारकांच्या रांगा लागल्या. अनेक पंपचालकांनी दुपारीच पेट्रोल-डिझेल संपल्याचे सांगितल्याने इंधनाच्या शाेधात भटकणाऱ्या वाहनधारकांचे जास्तच हाल झाले. काही ठिकाणी वादावादी हाेऊन समरप्रसंगही उद‌्भवले. यामुळे पिनाकारण वेळेचा अपव्यय हाेण्याबराेबरच अितरिक्त इंधन खरेदी करावे लागल्यामुळे नागरिकांचे अािर्थक नियाेजनहीि‍‍ि घडले. सायंकाळी बंद मागे घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास साेडला.
वाहनधारकांनी पंपांवर सकाळी वाजेपासूनच गर्दी केली होती. अनेकांना बंदबाबत उशिरा समजल्याने तीन वाजेनंतर पंपांना जणू युद्धभूमीचे स्वरूप अाले. तीन-तीन तास रांगेत उभे राहिल्यानंतर पेट्रोल मिळाले खरे, पण त्यामुळे चाकरमाने, व्यावसायिक, िवद्यार्थ्यांंचे वेळेचे सारे नियोजनकोलमडले. एका महिलेने तर नातवासाठी रुग्णालयात डबा घेऊन जावयाचे असल्याने िवलंबामुळे संताप व्यक्त केला. बंद बेमुदत असल्याने दररोज गरजेपुरतेच इंधन भरणाऱ्या अनेक वाहनचालकांनी नेहमीपेक्षा दुप्पट-ितप्पट जादा इंधन घेतले. त्यामुळे एेन महिनाअखेरीस आर्थिक नियोजन िबघडल्याची तक्रार काहींनी केली.
वाहतुकीचीहीझाली कोंडी
शहराच्यामध्यवर्ती त्र्यंबकनाका परिसरातील चारही पंपांवर वाहनधारकांनी केलेल्या गर्दीमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. त्र्यंबकनाक्याकडून सीबीएसकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या दोन पंपांपैकी प्रथम येणाऱ्या पंपावरील इंधनविक्री तर १२ वाजेपासूनच बंद होती. त्यामुळे शेजारच्या पंपावरच वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच, समाेरील बाजूस असलेल्या भारत पेट्रोलियमच्या पंपावरही दाेन वाजेलाच पेट्रोल संपले होते. िडझलचे मात्र िवतरण सुरू होते. सेंट्रल मॉलच्या िवरुद्ध बाजूस असलेल्या पंपावर दुचाकी-चारचाकी वाहनांसह बसही इंधनासाठी रांगेत उभ्या राहिल्याने दोन्ही बाजूची वाहतूक कोंडी वाढली होती.

विद्यार्थ्यांचे झाले हाल
दोन-तीनदिवसांची तजवीज करून ठेवण्यासाठी शाळा सुटल्यानंतर आलेल्या ऑटो रिक्षा, व्हॅन यांच्यासह शाळकरी विद्याथी वाहतूक करणारी वाहने दोन-दोन तास रांगेत उभी राहिली. त्यामुळे शेकडाे विद्यार्थ्यांना ताटकळत राहावे लागले.
रोज १७०० केएल विक्री
जिल्ह्यात३३४ पंप असून, रोज १२०० के. एल. (किलाेलिटर) डिझेल ५०० के. एल. पेट्रोलची विक्री होते. नाशिकमध्ये ५८ पंपांद्वारे १८९ के. एल. पेट्रोल १७९ के. एल. डिझेल िवक्री हाेते.
यासाठी हाेता बंद
इंधनावरीलएलबीटी कमी करून एमएससी रद्द करण्याच्या मागणीकडे शासन लक्ष देत नसल्याची तक्रार करीत मागण्या मान्य होईपर्यंत पंप खरेदी-विक्री बंद करण्याचा िनर्णय महाराष्ट्र पेट्रोल-डिझेल असोसिएशनने घेतला हाेता. त्यात जिल्हा पेट्रोल िडलर्स असो. सहभागी झाली हाेती.
अाज इंधन उपलब्ध
^पंपचालकांनीबंद मागे घेतला आहे. मंगळवारपासून सर्व पंपांवर वाहनचालकांना नेहमीप्रमाणे इंधन उपलब्ध असेल. -डी. बी. जवंजाळ,जिल्हापुरवठा अधिकारी

अादेशानुसार िनर्णय
राज्यसंघटनेच्या आदेशानुसारच जिल्हा संघटनेने आंदोलनाची घाेषणा केली हाेती. आता त्यांच्याच आदेशाने बंद मागे घेतला. सरकारऐवजी िवरोधी पक्षाने अाश्वासन िदले अाहे की, व्हॅट तीन टक्क्यांनी कमी करून एलबीटी रद्द करू. ‘स्टेट स्पेसिफिक कॉस्ट’ रद्द करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू. िवजयठाकरे, सेक्रेटरी,एनडीपीडीए

काय करू, तुम्हीच सांगा..
*माझानातू रुग्णालयात अॅडमिट आहे. त्याच्या जेवणाचा डबा घेऊन जायचे असून, तीन तासांपासून मी रांगेत उभी आहे. आता पंपचालक म्हणतात, पेट्रोल संपले. तुम्हीच सांगा, मी काय करू? -मीना सूर्यवंशी

काही पंपांवर चारचाकी वाहनांच्या रांगा थेट रस्त्यापर्यंत पाेहाेचल्या हाेत्या.
एरवी शिस्तीने पेट्राेल घेणाऱ्या वाहनधारकांनी पुढील तजवीज करून ठेवण्यासाठी बहुतांश पंपांवर अशी गर्दी केल्याने सर्वत्र माेठाच गाेंधळ उडाला हाेता.

नियाेजनच बिघडले...
मीदररोज आवश्यक इंधन भरतो. पण, बंद किती दिवस सुरू राहाणार, याची शाश्वती नसल्याने महिनाअखेर असतानाही सकाळी एक हजार आणि सायंकाळी पुन्हा ५०० रुपयांचे इंधन भरले. त्यामुळे नाही म्हटले तरी अार्थिक नियाेजन बिघडलेच. -ज्ञानेश्वर क्षीरसागर