आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोलचा पुरवठा होणार पोलिस बंदोबस्तात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भारत पेट्रोलियमच्या पानेवाडी प्रकल्पात टॅँकर वाहतूकदारांचा संप सुरू असल्याने राज्यातील 12 जिल्ह्यांतील इंधन वितरण अकरा दिवसांपासून कोलमडले आहे. यापुढे वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिकसाठी मुंबई येथील डेपोतून तर इतर जिल्ह्यांसाठी नगर, जळगाव आणि अकोला येथून पोलिस बंदोबस्तात इंधन पुरवठा करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी रविवारी घेतला.

इंधन वाहतूकीचे दर वाढवून मिळावेत या मागणीसाठी भारत पेट्रोलियम कंपनीच्या टँकर वाहतूकदारांनी संप सुरु केला आहे. कंपनीचे अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने डिलर्स व पेट्रोलपंप चालकही या संपात उतरल्याने मराठवाडा, विदर्भासह 12 जिल्ह्यात इंधन तुटवडा जाणवत आहे. अखेर या संपावर तोडगा काढण्यासाठी भारत पेट्रोलियम कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुब्रमण्यम यांनी रविवारी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीस विभागीय पुरवठा उपायुक्त रावसाहेब बागडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील उपस्थित होते.

पेट्रोलच्या दरात बदल नाही
भारत पेट्रोलियमच्या पंपावर इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात येणार नाही. सध्याचा पेट्रोलचा दर कायम राहाणार आहे. नाशिक शहरासह इतर शहरांमध्ये भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोलपंपाव्यतिरिक्त इतर पंपांना त्यांच्या कंपन्याचा इंधनाचा कोटा वाढून दिला जाणार आहे. त्यामुळे शहरात कोणत्याही प्रकारे पेट्रोलचा तुटवडा भासणार नसल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.