आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेतीन महिन्यांत पेट्राेल 3.83 तर डिझेल 2.25 रुपयांनी महागले, GSTतून वगळल्याने फायदा नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पेट्राेल डिझेलचे दर दरराेज बदल करून नफा किंवा ताेटा जनतेच्या माथी मारण्याचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या साडेतीन महिन्यात पेट्राेल तब्बल ३.८३ रुपयांनी तर डिझेल २.२५ रुपयांनी महागले अाहे. माेदी सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयांची सगळीकडेच सध्या चर्चा सुरू असताना वाढत्या महागाईच्या झळा बसत असलेल्या जनतेला शेजारील कर्नाटक राज्याच्या तुलनेत अाजही इंधन महाग घ्यावे लागत अाहे. तर कुठलीही कसरत न करता थेट करवसुली हाेत असल्याने एकट्या राज्य सरकारकडून पेट्राेलवर जवळपास २४ टक्के तर डिझेलवर २१ टक्के मूल्यवर्धित कर वसूल केला जात अाहे. 
 
केंद्रात काँग्रेसचे सरकार असतांना अांतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड अाॅइलच्या दरानुसार स्थानिक बाजारात दर असतील असे निर्णय घेतले गेले हाेते. त्यावेळेस क्रूड अाॅइल प्रचंड महागडे हाेते, त्यामुळे स्थानिक बाजारातही महागड्या दराने पेट्राेल-डिझेल खरेदी करावे लागत हाेते. त्यानंतर माेदी सरकार सत्तेत अाल्यानंतर अांतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड अाॅइलचे दर प्रचंड घसरले, मात्र त्याचा फायदा जनतेला मिळाला नाही, ६० ते ६२ रुपयांपर्यंत पेट्राेलचे दर त्यावेळेस अपेक्षित हाेते. मात्र, स्थानिक बाजारात हे दर त्या तुलनेत कमी झाले नाही. याच वर्षी १६ जूनपासून नफा-ताेट्यानुसार दरराेज दर बदलण्याचा निर्णय पेट्राेलियम कंपन्यांनी घेतला, मात्र त्यानंतर अवघ्या साडेतीन महिन्यांत इंधन वेगाने महागले अाहे. 
 
जीएसटीतून वगळल्याने फायदा नाही : ‘एकदेश एक कर’ ही संकल्पना देशपातळीवर रुढ करणारा वस्तू सेवाकर (जीएटी) जुलैपासून अमलात अाला खरा, मात्र पेट्राेल डिझेल जीएसटीतून बाहेर ठेवण्यात अाले अाहे. ते जर जीएसटीत समाविष्ट केले असते तर राज्यांचे विविध कर, अधिभारांतून मुक्त झाल्याने इंधन स्वस्त हाेऊन देशभर एकच दर राहू शकले असते. 
 
महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात पेट्राेल, डिझेल स्वस्त 
शेजारील राज्यांत महाराष्ट्रापेक्षा पेट्राेल डिझेल स्वस्त असते. महाराष्ट्रात पेट्राेलवर प्रति लिटरवर २४ टक्के मूल्यवर्धित कर अन् ११ रुपये अधिभार तर प्रति लिटर डिझेलवर २१ टक्के मूल्यवर्धित करासह रुपयांचा अधिभार अाकारला जात अाहे. कर्नाटकात पेट्राेलचे दर महाराष्ट्राच्या तुलनेत 9 रुपयांनी तर डिझेलचे दर किमान 3 रुपयांनी कमी अाहेत. 
 
पुढील स्‍लाइडवर...असे बदलत गेले पेट्रोल दर... 
बातम्या आणखी आहेत...