आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्राेलपंपावर कॅशलेस बंद निर्णय रात्रीतून मागे ,13 जानेवारीपर्यंत बँकांचे एमडीअार स्थगित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक: बँकांनी पाॅइंट अाॅफ सेल मशिन्सद्वारे इंधन खरेदीवर टक्क्यापर्यंत मर्चंट्स डिस्काउंट चार्ज (एमडीअार) अाकारण्याचे ठरवल्याने पेट्राेलपंप चालकांच्या राष्ट्रीय संघटनेने डेबिट क्रेडिट कार्डचे व्यवहार साेमवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रविवारी रात्री बँकांनी १३ जानेवारीपर्यंत या चार्जची अाकारणी स्थगित केली. परिणामी, पंपांवर निदान शुक्रवारपर्यंत (दि. १३) तरी ग्राहकांना कार्डद्वारे इंधन खरेदी करता येणार अाहे. 
 
या कर अाकारणीमुळे ग्राहकांशी वाद हाेतील पंपचालकांनाच ताे भरावा लागेल, यामुळे हा निर्णय घेतला गेला हाेता. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र माेदी ‘कॅशलेस’ व्यवहारांचा अाग्रह धरत अाहेत, डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर पेट्राेल-डिझेलच्या खरेदीकरिता करण्याला प्राेत्साहन मिळावे याकरिता खरेदी रकमेवर .७५ टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात पेट्राेलपंपावर कॅशलेस बंदचा निर्णय रात्रीतून मागे अाला अाहे. 
 
मात्र, ही रक्कम पेट्राेल पंपचालकांकडून तत्काळ कपात हाेत असली तरी त्यांना अाठ-दहा दिवसांनी केवळ .६० ते .६५ टक्केच रक्कम परत मिळत अाहे. यामुळेही पेट्राेल पंपचालक नाराज अाहेत. यातच अाता भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशांप्रमाणे हा मर्चंट डिस्काउंट चार्ज लागू हाेणार असून यातही पेट्राेलपंपचालकांनाच फटका बसणार असल्याने पंपचालकांची राष्ट्रीय संघटना कन्साेर्टियम अाॅफ इंडियन पेट्राेलियम डिलर्ससह राज्याची संघटना ‘फामपेडा’ने डेबिट-क्रेडिट कार्डचे व्यवहार करण्याचा निर्णय घेतला होता परंतु बँकांनी चार्ज आकारण्यास १३ जानेवारीपर्यंत स्थगिती दिल्याने पंपचालकांनी निर्णय मागे घेतला. 
 
पंप चालकांनाच भरावा लागेल कर 
- बँकांनी अाधी लागलीच मर्चंट डिस्काऊंट चार्ज अाकारण्याचे जाहीर केले हाेते. या चार्जमुळे पंपावर ग्राहक पेट्राेल भरल्यानंतर कार्ड स्वाइप करेल तेव्हा हा कर पंपचालकांनाच भरावा लागेल, हे परवडणारे नसल्याने हा कटू निर्णय घ्यावा लागला हाेता.
 -विजय ठाकरे, सचिव, नाशिक पेट्राे डिलर्स वेल्फेअर असाेसिएशन 
 
तर ३.५ काेटींचे कॅशलेस व्यवहार हाेतील बंद... 
जिल्ह्यातअसाेसिएशनचे सदस्य असलेले ३६५ पेट्राेलपंप अाहेत, त्यांवर सरासरी िदवसाला १६ काेटी रुपयांचे पेट्राेल तितकीच डिझेल विक्री हाेते. पंपांवर सध्या ३० टक्क्यांपर्यंत ‘कॅशलेस’ व्यवहार हाेत अाहेत ज्याची रक्कम साडेतीन काेटी अाहे. हे व्यवहार बंद झाल्यास राेख रकमेद्वारे जनतेला इंधन खरेदी करावी लागेल.
 
अशा प्रकारे कर अाकारणीची पद्धत 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार अाता पेट्राेल-डिझेल, अाॅईल खरेदीकरिता पाॅइंट अाॅफ सेल मशिनवर क्रेडिट डेबिट कार्ड स्वाइप केल्यानंतर मर्चंट डिस्काउंट चार्ज अाकारला जाणार अाहे. १००० रुपयांपर्यंत ताे .२५ टक्के असेल तर १००० ते २००० रुपयांपर्यंतच्या खरेदीवर ताे .५० इतका अाणि २००० रुपयांवरील खरेदीवर टक्के इतका असेल, असे पेट्राेलपंपचालकांच्या असाेसिएशनचे म्हणणे अाहे.