आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएफकडून महिन्यातच १०,९६१ दाव्यांचा निपटारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कर्मचारीभविष्य निधी संघटनेच्या भविष्य निधी कार्यालयाने दि. ते ३१ जुलै या अवघ्या एका महनि्याच्या काळातच १०,९६१ दाव्यांचा निपटारा केला असून, ४४५७.५१ लाख रुपये सदस्यांना अदा केले आहेत. यापैकी १९८७ दाव्यांचा तर केवळ तीन दिवसांतच निपटारा करण्यात आला असून, उर्वरित ८,९७४ दावे ३० दिवसांच्या आत निकाली काढण्यात आले. वेगवेगळ्या आस्थापनांवर कारवाई करत ८८.३३ लाख रुपयांची वसुली त्यांच्याकडून करण्यात आली असून, याच महनि्यात ७४४ सभासदांना निवृत्तिवेतनही सुरू करण्यात आल्याची माहिती क्षेत्रीय आयुक्त जगदीश तांबे यांनी दिली.

केवायसी आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबर यादृष्टीने भविष्य निधी विभागाचे वेगवान काम सुरू आहे. यानिमित्ताने कामात प्रचंड वेग आणि पारदर्शकता पाहायला मिळत

आहे. याच वेगवान पारदर्शक कामकाजाचा भाग म्हणून दर महनि्याच्या दहा तारखेला ‘निधी आपके निकट’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, भविष्य निधीचे सदस्य, नियोक्ता आणि निवृत्तिवेतनधारक यांच्याकरिताचा हा कार्यक्रम नुकताच नाशिक कार्यालयात पीएफचे क्षेत्रीय आयुक्त जगदीश तांबे यांच्या उपस्थितीत झाला.

या कार्यक्रमात २६ भविष्य निधी सदस्यांनी भाग घेतला त्यांच्या शंकांचे निरसन या कार्यक्रमात करण्यात आले. भविष्य निधीच्या २२ सदस्यांचे युनिव्हर्सल अकाउंट नंबर सक्रिय करण्यात आले आणि जागेवरच २४ तक्रारींचे निवारणही करण्यात आले.

मृतांच्या वारसांनाही फायदा
इडीएलआययोजनेंतर्गत ३३ दाव्यांचा निपटारा करून मृत सभासदांच्या वारसांना २८ लाख ५२ हजार ८८३ रुपये अदा करण्यात आले. जुलैमध्ये १६६ तक्रारींचे निवारण पंधरा दिवसांच्या आत करण्यात आल्याची माहिती तांबे यांनी या वेळी दिली.