आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोहेंबरमध्ये पीएच.डी. प्रवेश परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पुणे विद्यापीठाची पीएच.डी. प्रवेश परीक्षा 17 नोव्हेंबर रोजी होणार असून, इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या 11 जुलै 2009 च्या अधिसूचनेनुसार शैक्षणिक 2013-14 या वर्षासाठी पीएच.डी. प्रवेश परीक्षा होणार आहे. विविध विषयांच्या पाच हजार 92 जागा रिक्त जागांसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. परीक्षेबाबत सविस्तर माहिती www.unipune.ac.in/phdexam या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शैक्षणिक पात्रता : खुल्या प्रवर्गासाठी पदव्युत्तर पदवी परीक्षेत 50 टक्के गुण आवश्यक आहे. ग्रेड पॉइंट अँव्हरेज (जीपीए) प्रणालीतील विद्यार्थ्यांना समकक्ष ग्रेड अनिवार्य आहे. राखीव प्रवर्गासाठी पाच टक्के अट शिथिल आहे. म्हणजे 45 टक्के गुण अनिवार्य आहेत, तर विधी शाखेत पदव्युत्तर पदवी मिळविलेल्यांना 55 टक्के तर राखीव प्रवर्गांना 50 टक्के आवश्यक आहे.

लेखी परीक्षेतून सूट मिळालेल्यांनीही भरावा अर्ज : गेट, जीपीएटी, सेट, नेट, जेआरएफ, एसआरएफ, एम.फिल. या परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना लेखी परीक्षेतून सूट आहे मात्र, तिसरा टप्पा म्हणजे मुलाखत अनिवार्य आहे.

प्रवेश शुल्क याप्रमाणे : सर्वसाधारण गटासाठी एक हजार रुपये, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 750, खुल्या प्रवर्गासाठी 800, तर राखीव प्रवर्गासाठी 600 आहे. चलन बँक ऑफ महाराष्ट्र किंवा एचडीएफसी या बँकांतून काढता येईल.